Lokmat Money > बिझनेस न्यूज > Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 

Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 

GST new rates Marathi: २२ सप्टेंबरपासून लागू होणाऱ्या नवीन जीएसटी प्रणालीमुळे जीवनावश्यक वस्तूंसह अनेक उत्पादने स्वस्त होणार आहेत. जाणून घ्या नवीन ५% आणि १८% जीएसटी स्लॅब आणि शून्य जीएसटीच्या वस्तूंची माहिती.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 12:40 IST2025-09-20T12:40:06+5:302025-09-20T12:40:40+5:30

GST new rates Marathi: २२ सप्टेंबरपासून लागू होणाऱ्या नवीन जीएसटी प्रणालीमुळे जीवनावश्यक वस्तूंसह अनेक उत्पादने स्वस्त होणार आहेत. जाणून घ्या नवीन ५% आणि १८% जीएसटी स्लॅब आणि शून्य जीएसटीच्या वस्तूंची माहिती.

GST new rates Marathi: These items will be in '0' GST from Monday, 22 September have you seen them? | Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 

Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 

देशभरातील ग्राहकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. येत्या २२ सप्टेंबरपासून वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) दरांमध्ये मोठे बदल होत असून, यामुळे अनेक जीवनावश्यक वस्तूंसह इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने स्वस्त होणार आहेत. जीएसटी परिषदेने ३ सप्टेंबर रोजी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे १२% आणि २८% च्या सध्याच्या जीएसटी दरांचा टप्पा रद्द करण्यात आला आहे.

नवीन जीएसटी रचना

नवीन प्रणालीनुसार, आता केवळ दोनच जीएसटी दर लागू असतील: ५% आणि १८%. या निर्णयामुळे १२% जीएसटी स्लॅबमधील बहुतांश वस्तू आता ५% स्लॅबमध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे, २८% स्लॅबमधील अनेक उत्पादने आता १८% स्लॅबमध्ये आणली गेली आहेत, ज्यामुळे त्यांची किंमत कमी होणार आहे. या बदलामुळे एसी, टीव्ही, कार आणि बाईक यांसारख्या महागड्या वस्तूंवरही मोठा परिणाम होणार असून त्यांच्या किमती लक्षणीयरीत्या कमी होण्याची शक्यता आहे. हे बदल अर्थव्यवस्थेला चालना देणारे असून ग्राहकांची खरेदी क्षमता वाढण्यास मदत करतील अशी अपेक्षा आहे. सरकारचा हा निर्णय महागाई नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचा मानला जात आहे.

'शून्य जीएसटी' अंतर्गत येणाऱ्या वस्तू

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, काही ठराविक वस्तूंवर ‘शून्य जीएसटी’ आकारला जाईल. त्यामुळे या वस्तू अत्यंत स्वस्त उपलब्ध होतील आणि सामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळेल. अन्नपदार्थांव्यतिरिक्त, आरोग्य क्षेत्राला शून्य जीएसटीमध्ये ठेवण्यात आले आहे. जीवनरक्षक औषधे आणि आरोग्य विम्यावरील कर काढून टाकण्यात आला आहे. तसेच वैद्यकीय ऑक्सिजनवरील जीएसटी काढण्यात आला आहे.

पनीर आणि छेना (प्री-पॅकेज केलेले आणि लेबल केलेले) ५%  ०%
UHT (अल्ट्रा-हाय टेम्परेचर) दूध ५%  ०%
पिझ्झा ब्रेड ५%  ०%
खाखरा, चपाती किंवा रोटी ५% - ०%
पराठा, कुलचा आणि इतर पारंपारिक ब्रेड ५% ०%
वैयक्तिक आरोग्य आणि जीवन विमा १८% ०%
काही जीवनरक्षक औषधे (३३ औषधे) ०%
वैद्यकीय-ग्रेड ऑक्सिजन १२% ०%
शार्पनर, क्रेयॉन आणि पेस्टल १२% ०%
कॉपी, नोटबुक, पेन्सिल आणि इरेजर १२% ०%


 

Web Title: GST new rates Marathi: These items will be in '0' GST from Monday, 22 September have you seen them?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.