Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Groww IPO Listing: Google सारखीच आहे Groww ची कहाणी! एक चूक आणि बनलं ओळखीचं नाव, शेअर बाजारातही केलं अवाक्

Groww IPO Listing: Google सारखीच आहे Groww ची कहाणी! एक चूक आणि बनलं ओळखीचं नाव, शेअर बाजारातही केलं अवाक्

Groww IPO Listing: फिनटेक स्टार्टअप ग्रो ची बुधवारी शेअर बाजारात जबरदस्त लिस्टिंग झाली. अशी लिस्टिंग करणारी ही पहिली न्यू जनरेशन वेल्थटेक कंपनी ठरली आहे. ग्रो आणि सर्च इंजिन गूगलच्या नावांची कहाणी बरीच मिळती-जुळती आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 09:21 IST2025-11-13T09:18:47+5:302025-11-13T09:21:08+5:30

Groww IPO Listing: फिनटेक स्टार्टअप ग्रो ची बुधवारी शेअर बाजारात जबरदस्त लिस्टिंग झाली. अशी लिस्टिंग करणारी ही पहिली न्यू जनरेशन वेल्थटेक कंपनी ठरली आहे. ग्रो आणि सर्च इंजिन गूगलच्या नावांची कहाणी बरीच मिळती-जुळती आहे.

Groww IPO Listing story is similar to Google One mistake and it became a household name also left the stock market speechless | Groww IPO Listing: Google सारखीच आहे Groww ची कहाणी! एक चूक आणि बनलं ओळखीचं नाव, शेअर बाजारातही केलं अवाक्

Groww IPO Listing: Google सारखीच आहे Groww ची कहाणी! एक चूक आणि बनलं ओळखीचं नाव, शेअर बाजारातही केलं अवाक्

Groww IPO Listing: फिनटेक स्टार्टअप ग्रो (Groww) ची बुधवारी शेअर बाजारात जबरदस्त लिस्टिंग झाली. अशी लिस्टिंग करणारी ही पहिली न्यू जनरेशन वेल्थटेक कंपनी ठरली आहे. कंपनीनं लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी लोकांना आश्चर्यचकित केलं आणि गुंतवणूकदारांनी जबरदस्त नफा कमावला. ग्रो आणि सर्च इंजिन गूगलच्या नावांची कहाणी बरीच मिळती-जुळती आहे.

लिस्टिंगच्या निमित्ताने आठवणींना उजाळा

लिस्टिंगच्या निमित्तानं कंपनीचे सह-संस्थापक ललित केशरे यांनी Groww च्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण सांगितली आणि याच्या मुख्य मिशनबद्दल माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केलं की, स्टॉक गुंतवणूक ग्राहकांसाठी सोपी, पारदर्शक आणि आनंददायक करणं हे त्यांचं मुख्य उद्दिष्ट होतं. तसंच, स्मार्टफोनद्वारे ती सहज उपलब्ध करून देणं हा देखील त्यांचा उद्देश होता.

FREE मध्ये अपडेट होतंय Aadhaar Card, वर्षभरासाठी माफ झाली फी; पाहा कोणाला मिळणार फायदा?

जुन्या दिवसांच्या आठवणींना उजाळा

केशरे म्हणाले की, संस्थापकांना विश्वास होता की जेव्हा ग्राहकांना हे समजेल की ते शेअर खरेदी करून संपत्ती कमावू शकतात, तेव्हा ते आपोआप जोडले जातील. 'मी आमच्या सुरुवातीच्या काळातील समर्थकांचा आभारी आहे. आमच्याकडे टीम नव्हती. आमच्याकडे कोणतीही कमाई नसताना काही लोकांनी तेव्हा आम्हाला साथ दिली,' असंही ते म्हणाले.

नावामागे गूगलसारखी कहाणी

कंपनीचे आणखी एक सह-संस्थापक हर्ष जैन यांनी कंपनीचा प्रवास आणि तिच्या यशात ग्राहकांच्या भूमिकेबद्दल सांगितले. जैन म्हणाले की, ग्रोची सुरुवात एका छोट्या टीमनं, एका लहान ऑफिसमधून आणि काही लोक म्हणत असल्याप्रमाणे एका चुकीच्या लिहिलेल्या नावाने झाली होती. पण आज हे एक ओळखीचं नाव बनलं आहे. ग्रो नं आज लाखो लोकांचे आयुष्य बदललंय आणि त्यांना प्रेरित केलंय आणि पुढेही असंच करत राहील, असं ते म्हणाले.

गूगलच्या (Google) नावाची सुरुवात देखील एका चुकीच्या स्पेलिंगनं झाली होती. गूगलचं खरं स्पेलिंग Google आहे. हे नाव एका चुकीच्या वर्तनीतून आले आहे, जे गणितातील शब्द googol साठी होतं. हर्ष जैन यांच्या मते ग्रो (Groww) ची सुरुवात देखील चुकीच्या नावानं झाली. मात्र, योग्य नाव कोणतं होतं, हे हर्ष जैन यांनी सांगितलं नाही.

शेअर मार्केटमध्ये सुरुवात कशी राहिली?

Groww च्या शेअर्सनी बाजारात जबरदस्त सुरुवात केली. बीएसईवर हे शेअर आयपीओ मूल्यापेक्षा १४% वर म्हणजेच ₹ ११४ वर उघडले. यानंतर यात बरीच वाढ झाली. दिवसाच्या व्यवहारादरम्यान ते ₹ १३४.३४ पर्यंत पोहोचले होते. मात्र, एका वेळी ते ₹ ११२.०२ पर्यंत खाली आले होते. पण ते ₹ १३०.९४ वर बंद झाले. अशा प्रकारे, याने आयपीओ प्राइसच्या तुलनेत पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना सुमारे ३१ टक्के नफा दिला. ग्रे मार्केटमध्ये याचा जीएमपी (GMP) खूप चांगला नव्हता. त्यामुळे शानदार लिस्टिंग आणि पहिल्याच दिवशी जबरदस्त तेजीनं सर्वांना आश्चर्यचकित केलं.

Web Title : Groww IPO लिस्टिंग: गूगल जैसी कहानी, एक गलती और सफलता!

Web Summary : Groww की सफल IPO लिस्टिंग ने निवेशकों को चौंका दिया, जो Google के नामकरण की तरह है। संस्थापकों का लक्ष्य स्टॉक निवेश को सरल बनाना था। छोटी शुरुआत के साथ, Groww एक प्रसिद्ध नाम बन गया, लाखों लोगों को प्रेरित किया। शेयरों में मजबूत शुरुआत हुई, जिससे पहले दिन काफ़ी मुनाफ़ा हुआ।

Web Title : Groww IPO Listing mirrors Google's story: An accidental success!

Web Summary : Groww's successful IPO listing surprised investors, mirroring Google's accidental naming. Founders aimed to simplify stock investing. Starting small, Groww transformed into a well-known name, inspiring millions. Shares opened strong, delivering substantial first-day profits, exceeding expectations.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.