Gratuity Rules: आजकाल नोकरी बदलणे सामान्य बाब झाली आहे. अनेक कर्मचारी एका वर्षाच्या आतच नवीन नोकरी शोधतात. पूर्वी, ग्रॅच्युइटी मिळवण्यासाठी किमान 5 वर्षे एका संस्थेत काम करणे बंधनकारक होते. पण, आता सरकारने मोठा बदल करत ही अट शिथिल केली आहे. देशात लागू करण्यात आलेल्या 4 नव्या कामकार कायद्यानुसार, ग्रॅच्युइटीसाठीची किमान सेवा मुदत 5 वर्षांवरुन घटवून 1 वर्ष करण्यात आली आहे.
11 महिने नोकरी + 30 दिवस नोटिस पीरियड; 1 वर्ष मानले जाईल का?
नवीन नियमानुसार, एक वर्षाची सेवा पूर्ण केल्यावरच ग्रॅच्युइटीचा हक्क मिळतो. पण आता अनेकांना प्रश्न पडला असेल की, जर एखाद्या कर्मचाऱ्याने 11 महिने नोकरी केली आणि त्यानंतर 30 दिवस नोटिस पीरियड सर्व्ह केला, तर त्याला एक वर्ष पूर्ण मानले जाईल का?
याचे उत्तर कंपनीच्या नोंदीवर अवलंबून आहे
नोकरीचा कालावधी जॉइनिंग डेट ते लास्ट वर्किंग डे या कालावधीत मोजला जातो. नोटिस पीरियड त्यात तेव्हाच समाविष्ट होतो, जेव्हा कंपनी त्याला सेवा कालावधीचा भाग म्हणून नोंदवते.
म्हणूनच, जर कंपनीने 11 महिने + 30 दिवस नोटिस पीरियड ‘वर्किंग टेन्योर’मध्ये मोजले, तर पूर्ण 12 महिने पूर्ण होतील आणि कर्मचारी ग्रॅच्युइटीसाठी पात्र ठरेल. पण कंपनी नोटिस पीरियडला फक्त फॉर्मॅलिटी मानते आणि सर्व्हिस रेकॉर्डमध्ये समाविष्ट करत नाही, तर 1 वर्ष पूर्ण झाल्याचे समजले जाणार नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी लास्ट वर्किंग डेट तपासावी.
नवीन नियमांचा कर्मचारी वर्गाला कसा फायदा?
सरकारच्या या बदलामुळे अल्पकालीन काळासाठी काम करणारे, वारंवार नोकरी बदलणारे आणि एन्ट्री-लेव्हल कर्मचारी यांना मोठा फायदा होणार आहे. पूर्वी 5 वर्षांची अट असल्याने लाखो कर्मचार्यांना ग्रॅच्युइटी मिळत नव्हती. आता फक्त 1 वर्षाची सेवा पूर्ण करताच ग्रॅच्युइटीचा हक्क मिळू शकतो. कंपनीने सेवा कालावधीमध्ये एक वर्ष मान्य केले असल्यास कर्मचारी ग्रॅच्युइटी क्लेम करू शकतो. क्लेम करण्यासाठी HR विभागाला अर्ज करावा लागतो. हक्क नाकारला गेल्यास लेबर विभागाकडे तक्रार दाखल करता येते.
