Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > ग्रामसेवकांनी दरमहा 10 टक्के वसुली करावी

ग्रामसेवकांनी दरमहा 10 टक्के वसुली करावी

सीईओ काकाणी : लॅपटॉप अन् ताडपत्री खरेदीची अरुण डुबे करणार चौकशी

By admin | Updated: August 22, 2014 22:11 IST2014-08-22T22:11:51+5:302014-08-22T22:11:51+5:30

सीईओ काकाणी : लॅपटॉप अन् ताडपत्री खरेदीची अरुण डुबे करणार चौकशी

Gramsevaks should recover 10% per month | ग्रामसेवकांनी दरमहा 10 टक्के वसुली करावी

ग्रामसेवकांनी दरमहा 10 टक्के वसुली करावी

ईओ काकाणी : लॅपटॉप अन् ताडपत्री खरेदीची अरुण डुबे करणार चौकशी
सोलापूर: ग्रामपंचायतींनी पाणीप?ी वसूल केली पाहिज़े मालमत्ता रजिस्टरची नोंद ठेवली पाहिज़े मालमत्ता कर देखील वसूल करून विविध सुविधा निर्माण केल्या पाहिजेत. मूलभूत सुविधा देण्यासाठी ग्रामपंचायतींनी उत्पन्न वाढविले पाहिजे ़ यासाठी ग्रामसेवकांनी दरमहा 10 टक्के वसुली करावी अशा सूचना दिल्या असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश काकाणी यांनी दिली़
काकाणी यांनी विविध तालुक्यांचे दौरे सुरू केले आहेत़ शुक्रवारी त्यांनी बार्शी तसेच मोहोळ दौरा केला़ ग्रामपंचायती सक्षम झाल्या पाहिजेत. किमान गरजा भागविण्यासाठी ग्रामपंचायतींनी कर भरणे, पाणीप?ी वसूल करणे आदी कामे केली पाहिजेत. सर्व मालमत्ता करांच्या नोंदी ठेवणे, नव्या मालमत्तांच्या नोंदी घेणे, त्यांची करआकारणी करणे आदी कामे केली पाहिजेत अशी अपेक्षा काकाणी यांनी व्यक्त केली़ वसुलीच्या निमित्ताने ग्रामसेवकांचा ग्रामस्थांशी देखील संवाद राहील, विविध प्रश्न सुटतील असे ते म्हणाल़े या सर्व कामांची पाहणी अचानक केली जाईल असे काकाणी यांनी सांगितल़े
चौकशी संदर्भात अरुण दुबे म्हणाले की, सध्या आचारसंहिता लागण्यापूर्वी अनेक निर्णयाच्या फाईल प्रलंबित आहेत़ आचारसंहिता लागू झाल्यानंतर या प्रकरणाची सखोल चौकशी करु असे त्यांनी सांगितल़े

चौकट़़़
अतिरिक्त सीईओ चौकशी करणार
लॅपटॉप आणि ताडपत्री आदी साहित्यांचा निकृष्ट दर्जाचा पुरवठा झाल्यामुळे जिल्हा परिषदेच्या बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत बराच गोंधळ झाला़ आरोप-प्रत्यारोपामुळे ही खरेदी वादाच्या भोवर्‍यात सापडली त्यामुळे याची चौकशी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डुबे यांची नियुक्ती केल्याचे काकाणी यांनी सांगितल़े यापुढे अशी साहित्य तपासणी करुन खरेदी केली जाईल असेही काकाणी म्हणाल़े

कोट़़
शासनाने ठरवून दिलेल्या आऱसी (रेटकॉन्ट्रॅक्ट) मक्तेदाराकडून लॅपटॉप खरेदी केले आहेत़ गेल्यावर्षीचे लॅपटॉप चांगले आहेत़ ते तपासून घेण्याची अधिकार्‍यांची जबाबदारी होती़ शिलाई मशीन वेळेत पुरवठा होत नाही म्हणून आम्ही यापूर्वी सुत्रावे यांना काळ्या यादीत टाकण्याचा समितीमध्ये ठराव केला आह़े
शिवाजी कांबळे
सभापती-समाजकल्याण समिती, जि़प़

Web Title: Gramsevaks should recover 10% per month