Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > चांगला परफॉर्मन्स, उत्कृष्ट नफा… तरीही तब्बल ४००० कर्मचाऱ्यांना ही कंपनी घरी बसवणार; कारण जाणून बसेल धक्का?

चांगला परफॉर्मन्स, उत्कृष्ट नफा… तरीही तब्बल ४००० कर्मचाऱ्यांना ही कंपनी घरी बसवणार; कारण जाणून बसेल धक्का?

महत्वाचे म्हणजे, 'हा निर्णय कोणत्याही आर्थिक संकटामुळे घेण्यात आलेल नाही,' असे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) जॅक डोर्सी यांनी म्हटले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 15:27 IST2026-02-27T15:26:37+5:302026-02-27T15:27:13+5:30

महत्वाचे म्हणजे, 'हा निर्णय कोणत्याही आर्थिक संकटामुळे घेण्यात आलेल नाही,' असे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) जॅक डोर्सी यांनी म्हटले आहे.

Good performance, excellent profits Yet Block Inc company will make 4000 employees replace ai | चांगला परफॉर्मन्स, उत्कृष्ट नफा… तरीही तब्बल ४००० कर्मचाऱ्यांना ही कंपनी घरी बसवणार; कारण जाणून बसेल धक्का?

चांगला परफॉर्मन्स, उत्कृष्ट नफा… तरीही तब्बल ४००० कर्मचाऱ्यांना ही कंपनी घरी बसवणार; कारण जाणून बसेल धक्का?

साधारणपणे खराब परफॉर्मन्स अथवा आर्थिक दबावामुळे कोणतीही कंपनी कर्मचारी कपात करत असते.  मात्र, डिजिटल पेमेंट कंपनी 'Block Inc.'ने आर्थिक स्थिती मजबूत बळकट असतानाही ४००० हून अधिक कर्मचाऱ्यांना काढण्याचा निर्णय घेतला आहे. अशा पद्धतीने कंपनीने आपली कर्मचारी संख्या १०००० वरून कमी करत ६००० वर आण्याचा निर्णय घेतला आहे. 

महत्वाचे म्हणजे, 'हा निर्णय कोणत्याही आर्थिक संकटामुळे घेण्यात आलेल नाही,' असे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) जॅक डोर्सी यांनी म्हटले आहे.

कर्मचारी कपातीच्या निर्णयानंतरही शेअर्समध्ये २५ टक्क्यांची तेजी -
महत्वाची आणि आश्चर्याची गोष्ट म्हणाजे, कंपनीच्या या निर्णयानंतरही, कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी दिसून आली आहे. कंपनीचा शेअर २५ टक्क्यांपर्यंत वधारला आहे. गुंतवणूकदार याकडे खर्च नियंत्रण आणि कार्यक्षमता वाढवण्याची रणनीती म्हणून बघत आहेत. 

आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा (AI) परिणाम -
जॅक डोर्सी यांच्या मते, कंपनीचा नफा सातत्याने वाढत आहे, मात्र, संघटनात्मक रचनेत बदल करणेही आवश्यक होते. या मोठ्या कपातीमागे 'आर्टिफिशियल इंटेलिजेंस'चा (AI) वाढता वापर हे प्रमुख कारण आहे. एआय टूल्समुळे व्यवसायाची पद्धत बदलली आहे. लहान टीम्स देखील अधिक कार्यक्षमतेने काम करू शकत आहेत. वारंवार लहान कपात करण्यापेक्षा एकदाच मोठा निर्णय घेणे अधिक योग्य, असेही डोर्सी यांनी आपल्या 'X' वरील पोस्टमध्ये म्हटले आहे. 

Web Title : अच्छा मुनाफा, फिर भी छंटनी: कंपनी ने 4000 कर्मचारियों को निकाला

Web Summary : ब्लॉक इंक, मजबूत मुनाफे के बावजूद, एआई एकीकरण के कारण 4000 से अधिक कर्मचारियों को निकाल रही है। सीईओ जैक डोर्सी ने दक्षता लाभ और संगठनात्मक पुनर्गठन को कारण बताया। घोषणा के बाद शेयर 25% बढ़ गए, जो लागत में कटौती के उपायों के प्रति निवेशकों की मंजूरी का संकेत है।

Web Title : Good Profits, Mass Layoffs: Company Sacks 4000 Despite Success

Web Summary : Block Inc., despite strong profits, is laying off over 4000 employees due to AI integration. CEO Jack Dorsey cites efficiency gains and organizational restructuring as reasons. Shares surged 25% post-announcement, signaling investor approval of cost-cutting measures.