UPI Payment: जर तुम्ही दररोज यूपीआयनं पेमेंट करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. १६ जून २०२५ पासून डेबिट आणि क्रेडिट यूपीआय दोन्ही व्यवहार दुप्पट वेगानं पूर्ण होतील. एका व्यवहाराला सुमारे ३० सेकंद लागायचे, परंतु या प्रक्रियेत ते केवळ १५ सेकंदात पूर्ण होईल. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (NPCI) नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार हा बदल करण्यात येत आहे, ज्यामध्ये सर्व बँका आणि पेमेंट अॅप्सना एपीआय रिस्पॉन्स टाइम कमी करण्याच्या सूचना देण्यात आल्यात.
इतकंच नाही तर एखादा व्यवहार अयशस्वी झाला किंवा चुकून झाला तर त्याचे स्टेटस चेक किंवा रिव्हर्स करण्यासाठी आता फक्त १० सेकंद लागतील. यासाठी यापूर्वी ३० सेकंद लागत होते.
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
स्टेटस तपासण्यासही कमी वेळ लागेल
काही कारणास्तव व्यवहाराची स्थिती लगेच दिसत नसेल तर बँक किंवा अॅप (उदा. फोनपे, पेटीएम) 'चेक ट्रान्झॅक्शन स्टेटस एपीआय'च्या माध्यमातून स्टेटस शोधतात. आतापर्यंत एपीआय ९० सेकंदानंतर सुरू होत होता. जून २०२५ पासून हे अवघ्या ४५-६० सेकंदात सुरू करता येईल. म्हणजेच व्यवहाराची स्थिती तपासण्यासाठी तुम्हाला अर्धा वेळ लागेल.
पेमेंट सिस्टमची विश्वासार्हता आणि वेग दोन्ही सुधारेल
टेकफिनीचे सहसंस्थापक जय कुमार यांनी स्पष्ट केलं की, युजर्सना आपला व्यवहार झाला आहे की नाही याची माहिती त्वरीत मिळावी म्हणून हे पाऊल उचलण्यात आलं आहे. यामुळे पेमेंट सिस्टमची विश्वासार्हता आणि वेग दोन्ही सुधारेल. याचा थेट फायदा यूपीआय युजर्सना होणार आहे
यूपीआयच्या युजर्सना नवीन एपीआय नियम आणि वेळेतील बदलांचा थेट फायदा मिळणार आहे. चला जाणून घेऊया काही ठिकाणी ग्राहकांना होणाऱ्या फायद्यांविषयी...
- फास्ट स्टेटस अपडेट : त्वरित व्यवहाराची स्थिती कळेल, ज्यामुळे प्रतीक्षा कालावधी कमी होईल.
- फेल्युअर मार्किंगपासून मिळणार दिलासा : पूर्वी किरकोळ तांत्रिक अडचणींमुळे व्यवहार अयशस्वी मानले जात होते. आता ते कमी होतील.
- विश्वास आणि अनुभव सुधारला : यूपीआय युजर्सना प्रत्येक व्यवहारासह अधिक चांगला आणि वेगवान अनुभव मिळेल.