Lokmat Money > बिझनेस न्यूज > iPhone युजर्ससाठी खूशखबर! ट्रम्प यांच्या धमकीनंतरही Apple नं टाटांना सोपावलं दुरुस्तीचं काम

iPhone युजर्ससाठी खूशखबर! ट्रम्प यांच्या धमकीनंतरही Apple नं टाटांना सोपावलं दुरुस्तीचं काम

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अॅपलला भारतात अमेरिकेसाठी आयफोन बनवू नका अशी घमकीवजा सूचना केली होती. भारतात बनवलेले आयफोन अमेरिकेत विकल्यास त्यावर २५ टक्के शुल्क आकारलं जाईल, असा इशाराही त्यांनी दिला होता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 15:44 IST2025-06-06T15:44:08+5:302025-06-06T15:44:08+5:30

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अॅपलला भारतात अमेरिकेसाठी आयफोन बनवू नका अशी घमकीवजा सूचना केली होती. भारतात बनवलेले आयफोन अमेरिकेत विकल्यास त्यावर २५ टक्के शुल्क आकारलं जाईल, असा इशाराही त्यांनी दिला होता.

Good news for iPhone users despite donald trump s threat apple entrusts repair work to tata | iPhone युजर्ससाठी खूशखबर! ट्रम्प यांच्या धमकीनंतरही Apple नं टाटांना सोपावलं दुरुस्तीचं काम

iPhone युजर्ससाठी खूशखबर! ट्रम्प यांच्या धमकीनंतरही Apple नं टाटांना सोपावलं दुरुस्तीचं काम

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अॅपलला भारतात अमेरिकेसाठी आयफोन बनवू नका अशी घमकीवजा सूचना केली होती. भारतात बनवलेले आयफोन अमेरिकेत विकल्यास त्यावर २५ टक्के शुल्क आकारलं जाईल, असा इशाराही त्यांनी दिला होता. पण असं असूनही अॅपलनं भारतात आपलं काम झपाट्यानं वाढवलं आहे.

आयफोन आणि मॅकबुक

अॅपलने आता भारतातील आयफोन आणि मॅकबुकच्या दुरुस्तीची जबाबदारी टाटा समूहाकडे सोपवली आहे. अॅपलच्या पुरवठा साखळीत (उत्पादन आणि पुरवठ्याचं नेटवर्क) टाटा समूहाची भूमिका मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचं यावरून स्पष्ट होतं. एका रिपोर्टनुसार, अॅपल आता चीनऐवजी भारतात मॅन्युफॅक्चरिंगवर अधिक लक्ष केंद्रित करत असून टाटा ही त्यांची पहिली पसंती बनली आहे. टाटा यापूर्वीपासूनच दक्षिण भारतातील ३ ठिकाणी आयफोनचं उत्पादन करत आहे. आता ते कर्नाटकात आयफोनच्या दुरूस्तीचं कामही सुरू करणारे.

जगातील दुसरा सर्वात मोठा बाजार

भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाची स्मार्टफोन बाजारपेठ असून आयफोनची विक्री झपाट्याने वाढत आहे. गेल्या वर्षी भारतात सुमारे १.१ कोटी आयफोनची विक्री झाली होती, ज्यामुळे अॅपलला ७% मार्केट शेअर मिळाला होता, जो २०२० मध्ये केवळ १% होता.

या वर्षाच्या सुरुवातीला अॅपलनं शाओमीसारख्या चिनी कंपन्यांना मागे टाकलं आणि आता ते भारताच्या टॉप ५ स्मार्टफोन ब्रँडमध्ये सामील झाले आहे. हे सर्व अॅपल भारताकडे एक मोठी आणि विश्वासार्ह बाजारपेठ म्हणून पाहत आहे आणि भविष्यात येथे अधिक गुंतवणूक करू शकते हे दाखवून देते.

Web Title: Good news for iPhone users despite donald trump s threat apple entrusts repair work to tata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.