Lokmat Money > बिझनेस न्यूज > कर्मचाऱ्यांसाठी Good News ! इथं आठवड्याला करा ४ दिवस काम, २०० कंपन्यांचा मोठा निर्णय

कर्मचाऱ्यांसाठी Good News ! इथं आठवड्याला करा ४ दिवस काम, २०० कंपन्यांचा मोठा निर्णय

4-Day Work Week: आतापर्यंत २०० कंपन्यांनी आठवड्याला ४ दिवस काम करण्याचा नियम लागू केला आहे. ज्यात लंडनच्या ५९ कंपन्या आहेत. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 10:31 IST2025-01-28T10:31:02+5:302025-01-28T10:31:43+5:30

4-Day Work Week: आतापर्यंत २०० कंपन्यांनी आठवड्याला ४ दिवस काम करण्याचा नियम लागू केला आहे. ज्यात लंडनच्या ५९ कंपन्या आहेत. 

Good News for Employees! Work 4 days a week here, big decision of 200 companies of UK | कर्मचाऱ्यांसाठी Good News ! इथं आठवड्याला करा ४ दिवस काम, २०० कंपन्यांचा मोठा निर्णय

कर्मचाऱ्यांसाठी Good News ! इथं आठवड्याला करा ४ दिवस काम, २०० कंपन्यांचा मोठा निर्णय

एकीकडे भारतात काही उद्योगपती कर्मचाऱ्यांना आठवड्याला ७० ते ९० तास काम करण्याचा सल्ला देतायेत तर दुसरीकडे यूकेमध्ये २०० कंपन्यांनी एकत्रितपणे ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. द गार्जियन रिपोर्टनुसार, यूनाइटेड किंगडमच्या २०० ब्रिटीश कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना कुठलीही पगार कपात न करता आठवड्याला ४ दिवस काम करण्याचा नियम लागू केला आहे. या कंपन्यांमध्ये मार्केटिंग, औद्योगिक, चॅरिटी आणि आयटी सेक्टर कंपनीचा सहभाग आहे.

४ डे वर्किंग पॅटर्नचं समर्थन करणाऱ्यांनी सांगितले की, ५ डे वर्किंग पॅटर्न जुन्या आर्थिक युगातून वारसा मिळाला तो बदलण्याची आवश्यकता होती. ९ ते ५ वर्किंग पॅटर्न १०० वर्षापूर्वी बनला होता आणि आता आधुनिक वेळेनुसार तो उपयुक्त नाही. आठवड्याला ४ दिवस काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना रिकाम्या वेळेत आणखी चांगला वेळ आयुष्य जगण्याचं स्वातंत्र्य मिळेल. त्याशिवाय यातून उत्पादन क्षमताही वाढेल. कर्मचाऱ्यांना आकर्षिक करण्याचा हा उत्तम पर्याय आहे असं त्यांनी म्हटलं.

कोणत्या कंपन्यांनी केले बदल?

हे पाऊल सर्वात आधी मार्केटिंग, जाहिरात, प्रेस रिलेशनशी संबंधित ३० कंपन्यांनी उचललं. त्यानंतर औद्योगिक, आयटी, सॉफ्टवेअर कंपन्यांनी आदेश काढले. आतापर्यंत २०० कंपन्यांनी आठवड्याला ४ दिवस काम करण्याचा नियम लागू केला आहे. ज्यात लंडनच्या ५९ कंपन्या आहेत. 

कोविड १९ नंतर वर्क कल्चरमध्ये सुधारणा

कोविड महामारीच्या काळात वर्क फ्रॉम होम पॅटर्न आल्याने अनेक कर्मचाऱ्यांना पारंपारिक ढाच्यातून वेगळे केले. जेव्हा अनेक अमेरिकन कंपन्या जसं जेपी मॉर्गन चेस, अॅमेझोनसारख्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना आठवड्याला ५ दिवस ऑफिसला येण्याचे आदेश दिले तर त्याचा विरोध झाला. अनेक कर्मचाऱ्यांनी या आदेशाविरोधात घरून काम करण्याचा अधिकार देण्याची मागणी केली.

दरम्यान, एका सर्वेक्षणानुसार १८ ते ३४ वयोगटातील लोक आठवड्याला ४ दिवस काम करण्याचा नियम योग्य मानतात. जवळपास ७८ टक्के युवा वर्गाला पुढील ५ वर्षात हे वर्क कल्चर आदर्श वाटते. मानसिक आरोग्य आणि जीवनशैलीला सर्वोच्च प्राधान्य आहे. आठवड्याला ४ दिवस कामाचा निर्णय कर्मचाऱ्यांच्या जगण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी महत्त्वाचा आहे असं म्हटलं गेले आहे.

Web Title: Good News for Employees! Work 4 days a week here, big decision of 200 companies of UK

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.