8th Pay Commission: केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी वर्ष २०२६ अतिशय शानदार ठरणार आहे. जर तुम्ही सरकारी नोकरीत असाल किंवा पेन्शनचा लाभ घेत असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. महागाईची नवीन आकडेवारी समोर आली असून, त्यातून तुमच्या पगार आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ होण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. ८व्या वेतन आयोगाबाबत (8th Pay Commission 2026) सरकारकडून हालचाली वेगवान झाल्या असून, यामुळे आगामी काळात तुमच्या खिशात अधिक पैसे येणार असल्याचं स्पष्ट झालंय.
महागाई भत्त्यात किती होणार वाढ?
कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याबाबत (DA) एक मोठी अपडेट आली आहे. नोव्हेंबर महिन्यात कन्झ्युमर प्राईस इंडेक्स (AICPI-IW) मध्ये ०.५ पॉईंटची वाढ होऊन तो १४८.२ वर पोहोचला आहे. गेल्या पाच महिन्यांपासून हा निर्देशांक सतत वाढत आहे. नोव्हेंबरच्या आकडेवारीनुसार, महागाई भत्ता ५९.९३% पर्यंत पोहोचलाय. याचा अर्थ जानेवारी २०२६ पासून मिळणारा डीए आता ६०% च्या आकड्याला स्पर्श करू शकतो, जो गेल्या वर्षीच्या ५८% पेक्षा जास्त आहे. जर डिसेंबरची आकडेवारी वाढून आली, तर कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ पाहायला मिळेल. मात्र, अंतिम निर्णय सरकारच घेणार असल्याने, सध्या २% किंवा ३% वाढीची अपेक्षा करणे घाईचे ठरेल.
सोन्याच्या किंमतीत घसरण, मात्र चांदीच्या दरात जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पटापट चेक लेटेस्ट रेट
DA आणि DR मध्ये वाढ कशी ठरते?
सरकार हा पैसा नेमका कसा वाढवते, हे जाणून घेण्याची अनेकांची इच्छा असते. सोप्या भाषेत सांगायचं तर, सरकार दर ६ महिन्यांनी महागाईची आकडेवारी तपासते आणि त्या आधारावर कर्मचाऱ्यांचा डीए (DA) आणि पेन्शनधारकांचा डीआर (DR) निश्चित करते. सध्या आलेली आकडेवारी जुलै ते नोव्हेंबरपर्यंतची आहे.
जानेवारीपासून लागू होणाऱ्या नवीन दरांसाठी डिसेंबरचा डेटा शेवटचा असेल. महागाईचा कल असाच राहिला, तर नवीन वर्षाच्या पहिल्या सहामाहीत कर्मचाऱ्यांना महागाईचा सामना करण्यासाठी सरकारकडून अधिक मदत मिळेल.
८व्या वेतन आयोगाचे अपडेट्स
८व्या वेतन आयोगाबाबत (8th Pay Commission Latest Update) आता चित्र स्पष्ट होऊ लागलं आहे. सरकारनं नोव्हेंबर २०२५ मध्येच यासाठी आवश्यक मंजुरी दिली आहे. या नवीन आयोगाची धुरा निवृत्त न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या हातात आहे. याच्या शिफारसी येण्यासाठी साधारण १८ महिन्यांचा कालावधी लागू शकतो, मात्र महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा आयोग १ जानेवारी २०२६ पासूनच प्रभावी मानला जाईल. याचा अर्थ असा की, नियम लागू करण्यास विलंब झाला तरी कर्मचाऱ्यांना जुन्या काळातील पूर्ण एरिअर्स एकाच वेळी मिळतील.
पगार आणि पेन्शनमध्ये किती वाढ होणार?
८वा वेतन आयोग (8th Pay Commission Salary Hike) लागू झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या किमान मूळ पगारात (Basic Salary) मोठी वाढ होऊ शकते. सध्या सुरू असलेल्या चर्चांनुसार, किमान वेतन १८,००० रुपयांवरून थेट २६,००० रुपयांपर्यंत वाढू शकते. तसंच, ६९ लाख पेन्शनधारकांसाठीही आनंदाची बातमी आहे. पेन्शन रिव्हिजनला यावेळी विशेष प्राधान्य दिलं जाईल, असं सरकारनं स्पष्ट केलं आहे. अशा परिस्थितीत त्यांची किमान पेन्शन वाढून २०,५०० रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.
८वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर केवळ मूळ पगारच नाही, तर एचआरए (HRA), ट्रॅव्हल अलाउन्स आणि मेडिकल अलाउन्समध्येही बदल होण्याची शक्यता आहे. याचाच अर्थ हातात येणारा पगार लक्षणीय वाढू शकतो.
