lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Gold Rate : सोन्याच्या भावात महिन्याभरात मोठी घसरण; जाणून घ्या 10 ग्राम सोन्याचे दर

Gold Rate : सोन्याच्या भावात महिन्याभरात मोठी घसरण; जाणून घ्या 10 ग्राम सोन्याचे दर

Gold Price : आंतरराष्ट्रीय स्तरावर मागणीत झालेली घसरण आणि घरगुती बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या वधारलेल्या किमतीमुळे सोने-चांदीच्या दरात घसरण आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2020 05:13 PM2020-02-04T17:13:31+5:302020-02-04T17:14:11+5:30

Gold Price : आंतरराष्ट्रीय स्तरावर मागणीत झालेली घसरण आणि घरगुती बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या वधारलेल्या किमतीमुळे सोने-चांदीच्या दरात घसरण आली आहे.

gold silver rate today 4february 2020 gold prices dropped by rs 388 to rs 41270 per 10 gram | Gold Rate : सोन्याच्या भावात महिन्याभरात मोठी घसरण; जाणून घ्या 10 ग्राम सोन्याचे दर

Gold Rate : सोन्याच्या भावात महिन्याभरात मोठी घसरण; जाणून घ्या 10 ग्राम सोन्याचे दर

नवी दिल्लीः आंतरराष्ट्रीय स्तरावर मागणीत झालेली घसरण आणि घरगुती बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या वधारलेल्या किमतीमुळे सोने-चांदीच्या दरात घसरण आली आहे. दिल्लीतल्या सराफा बाजारात 10 ग्राम सोन्याचा दर 388 रुपयांनी घसरला आहे. तसेच चांदीचा भावसुद्धा 346 रुपयांनी प्रतिकिलोग्राम खाली आला आहे. फेब्रुवारी महिन्यातील सोन्याच्या दरातील ही सर्वात मोठी कपात आहे. शेअर बाजारात आलेल्या उत्साहामुळे गुंतवणूकदारांचं सोन्यावरून लक्ष विचलित झालेलं आहे. 

सोन्याचे नवे दर मंगळवारी दिल्लीतल्या सराफा बाजारात 41,658 रुपयांवरून घसरून 41,270 रुपये प्रति 10 ग्रामवर आले आहेत. तर दिल्लीत सोन्याच्या दरात 388 रुपयांची घसरण झाली आहे. सोमवारी दिल्लीतल्या सराफा बाजारात सोन्याचं भाव 281 रुपयांनी खाली येऊन 41,748 रुपये प्रति 10 ग्राम झाला होता. बजेट सादर करत असताना 1 फेब्रुवारी 2020मध्ये सोन्याचे दर वाढले होते. 10 ग्राम सोन्याचे दर 277 रुपयांनी महागले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत 1,570 डॉलर प्रति औंस झाली होती. तर चांदीचा दर 17.73 डॉलर प्रति औसांवर पोहोचला होता.

सोन्यासारखा चांदीच्या किमतींमध्येही घसरण आली आहे. औद्योगिक मागणीत कपात आल्यामुळे दिल्लीतल्या सराफा बाजारात चांदीची किंमत 47,426 रुपयांवरून घसरून 47,080 रुपये प्रति किलोग्रामवर आली आहे. HDFC सिक्युरिटीजचे सीनियर विश्लेषक तपन पटेल यांच्या मते, रुपयांची किंमत डॉलरच्या तुलनेत वाढल्यानं बाजारात उत्साह आहे. त्यामुळेच सोन्याच्या दरामध्ये चढाओढ पाहायला मिळते आहे. चीनच्या सेंट्रल बँकेने अर्थव्यवस्थेत तरलता आणण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. त्यामुळे जगभरातल्या शेअर बाजारांमध्ये उत्साह आहे. त्यामुळेच सोन्यात गुंतवणूक करण्यात गुंतवणूकदारांचं दुर्लक्ष झालेलं आहे.  

Web Title: gold silver rate today 4february 2020 gold prices dropped by rs 388 to rs 41270 per 10 gram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Goldसोनं