Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या तेजीवर ब्रेक; चांदीत ११ हजारांपेक्षा अधिक घसरण, सोन्याचे दर काय? जाणून घ्या

Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या तेजीवर ब्रेक; चांदीत ११ हजारांपेक्षा अधिक घसरण, सोन्याचे दर काय? जाणून घ्या

Gold Silver Rate 10 Feb On MCX: दोन दिवसांच्या वाढीनंतर सोन्याच्या दरात घसरण नोंदवण्यात आली आहे, कारण अस्थिर बाजारपेठेत गुंतवणूकदारांनी नफा वसुली करण्यावर भर दिल्याचं समोर आलंय. पाहा काय आहेत नवे दर.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 10:31 IST2026-02-10T10:30:04+5:302026-02-10T10:31:32+5:30

Gold Silver Rate 10 Feb On MCX: दोन दिवसांच्या वाढीनंतर सोन्याच्या दरात घसरण नोंदवण्यात आली आहे, कारण अस्थिर बाजारपेठेत गुंतवणूकदारांनी नफा वसुली करण्यावर भर दिल्याचं समोर आलंय. पाहा काय आहेत नवे दर.

Gold Silver Price Today on mcx 10th feb 2025 white metal falls by more than 11 thousand what is the price of gold | Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या तेजीवर ब्रेक; चांदीत ११ हजारांपेक्षा अधिक घसरण, सोन्याचे दर काय? जाणून घ्या

Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या तेजीवर ब्रेक; चांदीत ११ हजारांपेक्षा अधिक घसरण, सोन्याचे दर काय? जाणून घ्या

Gold Silver Rate 10 Feb On MCX: दोन दिवसांच्या वाढीनंतर सोन्याच्या दरात घसरण नोंदवण्यात आली आहे, कारण अस्थिर बाजारपेठेत गुंतवणूकदारांनी नफा वसुली करण्यावर भर दिल्याचं समोर आलंय. मंगळवारी सकाळी देशांतर्गत वायदा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत घट दिसून आली. एमसीएक्सवर (MCX) एप्रिल महिन्यासाठीचे सोन्याचे वायदा दर १.६ टक्क्यांनी म्हणजेच सुमारे २,५०० रुपयांनी घसरून १,५५,५४६ रुपये प्रति १० ग्रॅमवर आले. त्याचप्रमाणे चांदीचा वायदा दर ४ टक्क्यांहून अधिक म्हणजेच ११,००० रुपयांहून जास्त घसरून २,५१,५४४ रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील स्थिती

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या किमती सुरुवातीच्या व्यवहारात १.४ टक्क्यांपर्यंत घसरल्या आणि काही काळासाठी त्या ५,००० डॉलर प्रति औंसच्या खाली गेल्या होत्या, मात्र नंतर या नुकसानीची काही प्रमाणात भरपाई झाली. २९ जानेवारी रोजी सोन्यानं आपला विक्रमी उच्चांक गाठला होता, तेव्हापासून सोन्याच्या दरात आतापर्यंत सुमारे १० टक्क्यांची घसरण झाली आहे, तरीही या वर्षी सोनं मजबुतीनं वरच्या पातळीवर आहे. सिंगापूरमध्ये सकाळी ८:०० वाजेपर्यंत स्पॉट गोल्ड ०.५ टक्क्यांनी घसरून ५,०३२.५३ डॉलर प्रति औंसवर पोहोचले, तर चांदी १.८ टक्क्यांनी घसरून ८१.९२ डॉलरवर आली. प्लॅटिनम आणि पॅलेडियमच्या किमतीतही घसरण दिसून आली.

युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या

घसरणीची प्रमुख कारणं

सोन्या-चांदीच्या दरात घसरण होण्यामागे अमेरिकन डॉलर इंडेक्समधील वाढ हे एक मुख्य कारण आहे. हा इंडेक्स ९६.८२ वरून वाढून ९७.०१ वर पोहोचला आहे, ज्यामुळे परदेशी खरेदीदारांसाठी डॉलर-आधारित सोनं महाग झालं. याव्यतिरिक्त, या आठवड्यात जाहीर होणाऱ्या अमेरिकेतील रोजगार आणि महागाईच्या महत्त्वाच्या आकडेवारीपूर्वी गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली आहे. या आकडेवारीवरून भविष्यातील व्याजदरांच्या संदर्भात संकेत मिळण्याची अपेक्षा आहे.

बाजाराची पुढची दिशा

जानेवारीच्या अखेरीस मौल्यवान धातूंमध्ये मोठी घसरण झाली होती. मात्र, दीर्घकालीन तेजीसाठी कारणीभूत असलेले घटक, जस की वाढलेले भू-राजकीय धोके, मध्यवर्ती बँकांकडून होणारी खरेदी आणि सरकारी रोखे व चलनांमधून गुंतवणूकदारांचं बाहेर पडणं, हे अद्यापही प्रभावी आहेत. ब्लूमबर्गच्या मते, डॉयचे बँक एजी आणि गोल्डमॅन सॅक्स ग्रुप इंक सारख्या अनेक बँकांनी आणि मालमत्ता व्यवस्थापकांनी बुलियनच्या पुनरागमनाला पाठिंबा दिला आहे. जानेवारीमध्ये चीनच्या मध्यवर्ती बँकेनं आपली सोन्याची खरेदी सलग १५ व्या महिन्यापर्यंत वाढवली आहे, जे अधिकृत मागणीची मजबुती दर्शवते.

Web Title : सोने-चांदी की कीमतों में गिरावट: हालिया उछाल के बाद तेज गिरावट

Web Summary : मुनाफावसूली और डॉलर में मजबूती के कारण दो दिनों की तेजी के बाद सोने और चांदी की कीमतों में भारी गिरावट आई। एमसीएक्स सोना वायदा 1.6% गिरा, जबकि चांदी ₹11,000 प्रति किलो से अधिक गिर गई। वैश्विक कारक और आगामी अमेरिकी डेटा बाजार की दिशा को प्रभावित करते हैं।

Web Title : Gold, Silver Prices Dip: Sharp Decline After Recent Surge

Web Summary : Gold and silver prices fell sharply after a two-day rally, driven by profit-taking and a stronger dollar. MCX gold futures dropped 1.6%, while silver plummeted over ₹11,000 per kg. Global factors and upcoming US data influence market direction.