Gold Silver Price 1 October: सोन्या-चांदीतील तेजी थांबायला तयार नाही. ऑक्टोबरच्या पहिल्या दिवशी आज सोन्याच्या भावात एका झटक्यात १२३७ रुपयांची वाढ झाली, तर चांदीच्या दरात १६९१ रुपयांची वाढ झाली आहे. २४ कॅरेट सोन्याचा भाव जीएसटीसह आता १,१२,०८३ रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदी जीएसटीसह १,४८,४४८ रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.
आयबीजेएच्या (IBJA) माहितीनुसार, आज सोनं जीएसटीशिवाय १,१६,५८६ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडलं, तर मंगळवारी ते जीएसटीशिवाय १,१५,३४९ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झालं होतं. दुसरीकडे, चांदी जीएसटीशिवाय १,४४,१२५ रुपये प्रति किलोवर बंद झाली होती. आज चांदी जीएसटीशिवाय १,४४,१२५ रुपये प्रति किलोच्या दरानं उघडली. आयबीजेए दिवसातून दोनदा दर जारी करते; एकदा दुपारी १२ वाजता आणि दुसरा ५ वाजता दर जाहीर केले जातात.
सणासुदीच्या काळात खरेदी करताना अशी टाळा फसवणूक
सप्टेंबर २०२५ मध्ये सोन्याचा दर १२,९६१ रुपये प्रति १० ग्रॅमनं महागला. तर, चांदीच्या किमतीत प्रति किलो २४,८६२ रुपयांची वाढ झाली. आयबीजेएच्या दरानुसार, ऑगस्टच्या अंतिम कामकाजाच्या दिवशी सोनं १,०२,३८८ रुपये प्रति १० ग्रॅम दरावर बंद झालं होतं. चांदी देखील १,१७,५७२ रुपये प्रति किलोच्या दरावर बंद झाली होती.
कॅरेटनुसार आज सोन्याचे दर
आज २३ कॅरेट सोनेही १२३२ रुपयांनी महागलं आणि १,१६,११९ रुपये प्रति १० ग्रॅमच्या दरानं उघडले. जीएसटीसह त्याची किंमत आता १,१९,६०२ रुपये झाली आहे. यात अजून मेकिंग चार्ज जोडलेला नाही.
२२ कॅरेट सोन्याची किंमत १२३३ रुपयांनी वाढून १,०६,७९३ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचली आहे. जीएसटीसह ती १,०९,९९६ रुपये आहे.
आज १८ कॅरेट सोनं ९२८ रुपयांची वाढून ८७,४४० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचलं आणि जीएसटीसह त्याची किंमत ९०,०६३ रुपये प्रति १० ग्रॅमवर झाली. तर १४ कॅरेट सोनं ७२४ रुपयांनी महाग होऊन ६८,२०३ रुपयांवर उघडलं आणि आता जीएसटीसह ७०,२४९ रुपयांवर पोहोचलं.