Gold Silver Price Today 6 March: गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात तेजी दिसून येत आहे. आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ४६ रुपयांनी वाढून ८६,३४६ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. तर, चांदी ९०५ रुपयांनी वधारून ९६,८९८ रुपये प्रति किलोग्रॅमवर उघडली. तर २२ कॅरेट सोन्याचा सरासरी स्पॉट भाव ४२ रुपयांनी वाढून ७९,०९३ रुपये झालाय.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननं (आयबीजेए) हे दर जाहीर केले आहेत. यामध्ये जीएसटीचा समावेश करण्यात आलेला नाही. कदाचित तुमच्या शहरात १००० ते २००० रुपयांचा फरक पडत असेल. आयबीजेए दिवसातून दोनदा दर जारी करते. एकदा दुपारी १२ च्या सुमारास, तर दुसऱ्याला सायंकाळी ५ च्या सुमारास हे दर जारी केले जातात.
आयबीजेएच्या दरानुसार २३ कॅरेट सोन्याचा भाव ४६ रुपयांनी वाढून ८६ हजार रुपये प्रति १० ग्रॅम झाला. तर १८ कॅरेटचा भाव ३५ रुपयांनी वाढून ६६,९६० रुपये झालाय. तर १४ कॅरेट सोन्याचा भाव ४८ रुपयांनी वाढून ५०,५१२ रुपये झालाय.
चांदी ३,४१८ रुपयांनी महागली
४ दिवसात सोनं १२९० रुपयांनी तर चांदी ३४१८ रुपयांनी महागली आहे. १ मार्च आणि २ मार्च ला शनिवार-रविवार असल्याने आयबीजेए दर जाहीर करत नाही. २८ फेब्रुवारीला सोन्याचा भाव ८५,०५६ रुपये होता. तर चांदीचा भाव ९३,४८० रुपये होता. २०२५ मध्ये आतापर्यंत सोनं १०,६०६ रुपयांनी तर चांदी १०,८८१ रुपयांनी महाग झाली आहे. ३१ डिसेंबर २०२० रोजी सोनं ७५,७४० रुपयांवर बंद झालं होतं. चांदीही ८६,०१७ रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली.
एमसीएक्सवर किंमत काय?
एमसीएक्सवर आज सकाळी सोन्याचा भाव ८६,०७७ रुपयांवर उघडला आणि ८६,०८९ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्डचा भाव २,९२२ डॉलर प्रति औंस तर कॉमेक्स सोन्याचा भाव २,९३१ डॉलर प्रति ट्रॉय औंस होता.