Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर जोरदार आपटले; Silver ₹३९७३ नं घसरली, Gold किती झालं स्वस्त? पटापट पाहा रेट्स

Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर जोरदार आपटले; Silver ₹३९७३ नं घसरली, Gold किती झालं स्वस्त? पटापट पाहा रेट्स

Gold Silver Rate Today: सराफा बाजारात आज सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घट पाहायला मिळाली आहे. आज चांदीचा भाव ३,९७३ रुपयांनी घसरलाय.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 13:51 IST2025-12-30T13:50:10+5:302025-12-30T13:51:04+5:30

Gold Silver Rate Today: सराफा बाजारात आज सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घट पाहायला मिळाली आहे. आज चांदीचा भाव ३,९७३ रुपयांनी घसरलाय.

Gold Silver Price Today 30 december Gold and silver prices hit hard Silver fell by rs 3973 how much cheaper has gold become Quickly see the rates | Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर जोरदार आपटले; Silver ₹३९७३ नं घसरली, Gold किती झालं स्वस्त? पटापट पाहा रेट्स

Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर जोरदार आपटले; Silver ₹३९७३ नं घसरली, Gold किती झालं स्वस्त? पटापट पाहा रेट्स

Gold Silver Rate Today: सराफा बाजारात आज सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घट पाहायला मिळाली आहे. आज चांदीचा भाव ३,९७३ रुपयांनी घसरुन २,३१,४६७ रुपये प्रति किलोवर आला आहे. तसंच सोन्याच्या किमतीतही प्रति १० ग्रॅम २,४१९ रुपयांची घसरण नोंदवण्यात आली आहे. जीएसटीसह चांदीचा दर आता २,३८,४११ रुपये प्रति किलो झाला आहे, तर २४ कॅरेट सोन्याचा दर जीएसटीसह १,३८,३९२ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचलाय. २९ डिसेंबर रोजी सोन्यानं १३,८,१८१ रुपयांचा ऐतिहासिक उच्चांक गाठला होता, त्या तुलनेत आता सोनं ३,७९९ रुपयांनी स्वस्त झालंय. तर चांदी आपल्या सर्वोच्च स्तरावरून (२,४३,४८३ रुपये) ११,९७१ रुपयांनी घसरली आहे.

सोमवारची स्थिती आणि आजची बाजार सुरुवात

सोमवारी चांदी जीएसटीशिवाय २,४३,४८३ रुपये प्रति किलो या विक्रमी स्तरावर उघडली होती आणि २,३५,४४० रुपयांवर बंद झाली होती. त्याचप्रमाणे सोनं जीएसटीशिवाय १३,८,१६१ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडून १३,६,७८१ रुपयांवर बंद झालं होतं. आज बाजाराच्या सुरुवातीला विना जीएसटी सोन्याचा भाव १,३४,३७२ रुपयांवर उघडला. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनद्वारे (IBJA) हे दर जाहीर करण्यात आले आहेत. आयबीजेए दिवसातून दोनदा जारी करते. एकदा दुपारी १२ वाजता आणि दुसऱ्यांदा संध्याकाळी ५ वाजता दर जाहीर केले जातात.

बाजारात एन्ट्री घेताच जोरदार आपटला 'हा' शेअर, पहिल्याच दिवशी २४% नं घसरला, गुंतवणूकदारांना मोठा झटका

या वर्षातील सोने-चांदीची विक्रमी वाटचाल

चालू वर्षात सोन्याच्या किमतीत आतापर्यंत ५८,६२२ रुपयांची वाढ झाली आहे, तर चांदी १४५,४५० रुपयांनी वधारली आहे. एकट्या डिसेंबर महिन्यात चांदी ७१,०८१ रुपयांनी आणि सोनं १०,१९० रुपयांनी महागलंय. सोमवारी झालेल्या मोठ्या घसरणीनंतरही या वर्षातील एकूण वाढ लक्षणीय आहे.

कॅरेटनुसार सोन्याचे ताजे दर (विना मेकिंग चार्ज)

  • २३ कॅरेट गोल्ड: २,४०७ रुपयांच्या घसरणीसह १,३३,२३६ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडलं. जीएसटीसह याची किंमत १,३७,८४० रुपये झाली आहे.
  • २२ कॅरेट गोल्ड: २,२१५ रुपयांनी घसरून १,२३,०७६ रुपये प्रति १० ग्रॅमवर आलं. जीएसटीसह हा दर १,२६,७६८ रुपये आहे.
  • १८ कॅरेट गोल्ड: १,८१४ रुपयांच्या घसरणीसह १,००,७७२ रुपये प्रति १० ग्रॅमवर आलं असून जीएसटीसह याची किंमत १,०३,७९५ रुपये आहे.
  • १४ कॅरेट गोल्ड: १,४१५ रुपयांनी स्वस्त होऊन ७८,६०२ रुपयांवर उघडलं आणि जीएसटीसह ८०,९६० रुपयांवर पोहोचलं आहे.

Web Title : सोना, चांदी के दामों में भारी गिरावट! नवीनतम दरें जांचें।

Web Summary : आज बाजार में सोना और चांदी के भाव गिरे। चांदी ₹3,973 गिरकर ₹2,31,467 प्रति किलो हो गई, जबकि सोना ₹2,419 प्रति 10 ग्राम कम हो गया। इस गिरावट के बावजूद, सोने और चांदी ने इस साल काफी लाभ देखा है।

Web Title : Gold, silver prices crash! Check latest rates now.

Web Summary : Gold and silver prices tumbled in the market today. Silver fell by ₹3,973 to ₹2,31,467 per kg, while gold decreased by ₹2,419 per 10 grams. Despite this drop, gold and silver have seen significant gains this year.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.