Gold Silver Price Today 19 Jan 2026: एमसीएक्सनंतर (MCX) सराफा बाजारातही आज सोन्या-चांदीच्या भावांनी नवीन उच्चांक गाठला आहे. चांदीच्या किमतींनी नवा इतिहास रचला. शुक्रवारच्या बंद भावाच्या तुलनेत आज चांदी एका झटक्यात ११,७६० रुपयांनी वधारली, तर सोनं २,३८५ रुपयांनी महागलं. या वाढीसह, चांदी या वर्षी केवळ १९ दिवसांत ६३,२३० रुपयांनी महागली, तर सोन्याच्या भावात फक्त १०,७८१ रुपयांची वाढ झाली आहे. म्हणजेच या वर्षी चांदीचा वेग सोन्याच्या तुलनेत जवळपास सहा पट जास्त आहे.
आज चांदीचा भाव जीएसटीशिवाय २,९३,६५० रुपये प्रति किलोवर पोहोचला. जीएसटीसह चांदीचा भाव आता ३,०२,४५९ रुपये प्रति किलो झालाय. दुसरीकडे, २४ कॅरेट सोन्याचा दर आता जीएसटीसह १,४८,२९७ रुपये प्रति १० ग्रॅमवर आहे. जीएसटीशिवाय सोन्याचे भाव आज १,४३,९७८ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडले.
शुक्रवारी चांदी जीएसटीशिवाय २,८१,८९० रुपयांवर बंद झाली होती. त्याचप्रमाणे, सोनं जीएसटीशिवाय १,४१,५९३ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झालं होतं. हे दर आयबीजेए (IBJA) द्वारे जारी करण्यात आले आहेत. आयबीजेए दिवसातून दोनदा दर जारी करते; एकदा दुपारी १२ च्या सुमारास आणि दुसरे संध्याकाळी ५ च्या सुमारास दर जारी केले जातात.
धनत्रयोदशीच्या दिवशी १० ग्रॅम सोनं १,३२,४०० रुपयांना मिळत होतं, तर एक किलो चांदी १,७०,००० रुपये होती. परंतु शुक्रवारी दिल्लीच्या सराफा बाजारात १० ग्रॅम सोन्याचा भाव १,४३,७६० रुपये होता, तर एक किलो चांदी ३ लाखांच्या पुढे गेली आहे.
कॅरेटनुसार सोन्याचे भाव
२३ कॅरेट गोल्ड: आज २,३७५ रुपयांनी वधारून १,४३,४०१ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडलं. जीएसटीसह याची किंमत आता १,४७,७०३ रुपये झाली आहे. यामध्ये अद्याप मेकिंग चार्ज जोडलेला नाही.
२२ कॅरेट गोल्ड: २,१८५ रुपयांनी महाग होऊन १,३१,८८४ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचलं आहे. जीएसटीसह हा भाव १,३५,८४० रुपये आहे.
१८ कॅरेट गोल्ड: १८ कॅरेट सोन्यात १,७८९ रुपयांची वाढ झाली आहे. आज हे १,०७,९८४ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडलं आणि जीएसटीसह याची किंमत १,११,२२३ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचली आहे.
१४ कॅरेट गोल्ड: १४ कॅरेट सोन्याचा दरही १,३९५ रुपयांनी वाढला आहे. आज हे ८४,२२७ रुपयांवर उघडले आणि जीएसटीसह ८६,७५३ रुपयांवर आहे.
