Gold Silver Price Today: सोने-चांदीच्या दरात आज घसरण पाहायला मिळत आहे. मोठ्या तेजीनंतर आज सराफा बाजारात आज सोन्या-चांदीच्या किमतीत घसरण झाली. चांदीचे दर २,०१,२५० रुपयांच्या 'ऑल टाइम हाय'वरून घसरून २,००,३३६ रुपयांवर आले असून, त्यात प्रति किलो १,६०९ रुपयांची घट झाली.
दुसरीकडे, सोन्याचा भाव जीएसटीशिवाय ८० रुपयांच्या घसरणीसह १,३२,३९४ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडला. जीएसटीसह चांदीचा दर आता २,०६,३४६ रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे, तर २४ कॅरेट सोन्याचा दर जीएसटीसह १,३६,३६५ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे.
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
यापूर्वी बुधवारी चांदी जीएसटीशिवाय २,०१,१२० रुपये प्रति किलो आणि सोने जीएसटीशिवाय १,३२,४७४ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झालं होतं. या वर्षात आतापर्यंत सोन्याच्या दरात ५६,६५४ रुपयांची, तर चांदीच्या दरात १,१४,३१९ रुपयांची मोठी वाढ झाली आहे. आज चांदीचे भाव तिच्या आतापर्यंतच्या सर्वोच्च स्तरापेक्षा ९१४ रुपयांनी स्वस्त आहेत. आयबीजेएनं सोन्या चांदीचे नवे दर जाहीर केले आहेत.
कॅरेटनुसार काय आहे किंमत?
कॅरेटनुसार सोन्याच्या किमती पाहता, आज २३ कॅरेट सोनं ८० रुपयांनी घसरून १,३१,८६४ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडलं. जीएसटीसह त्याची किंमत १,३५,८१९ रुपये झाली आहे. २२ कॅरेट सोन्याची किंमत ७३ रुपयांनी कमी होऊन १,२१,२७३ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचली असून जीएसटीसह हा दर १,२४,९११ रुपये आहे.
१८ कॅरेट सोन्यात ६० रुपयांची घसरण झाली असून ते ९९,२९६ रुपयांवर आले आहे, जे जीएसटीसह १,०२,२७४ रुपये प्रति १० ग्रॅम पडतं. तसंच, १४ कॅरेट सोन्याचा दर ४६ रुपयांनी घसरून ७७,४५१ रुपयांवर उघडला असून जीएसटीसह तो ७९,७७४ रुपये इतका झाला. या सर्व किमतींमध्ये मेकिंग चार्जेसचा समावेश करण्यात आलेला नाही.
