Gold Silver Price Today: आज, सोमवार, १ डिसेंबर रोजी सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या भावात मोठी वाढ दिसून येत आहे. एका झटक्यात चांदी ९,३८१ रुपयांनी वाढली असून, सोनं २,०११ रुपयांनी महाग झालंय. आज २४ कॅरेट सोन्याचा भाव देखील २,०११ रुपयांनी महाग होऊन जीएसटीशिवाय १,२८,६०२ रुपये प्रति १० ग्रॅम वर उघडला. २२ कॅरेट सोन्याचा भाव आज जीएसटीसह १,२१,९२९ रुपये आणि १८ कॅरेट सोन्याचा भाव ९९,३४५ रुपये प्रति १० ग्रॅम वर पोहोचला आहे.
चांदीच्या दरात वाढ होण्याची कारणं
या वर्षी चांदीची किंमत दुप्पट झाली आहे आणि सलग सहा सत्रांपासून तिचे दर वाढत आहेत. पुरवठा आणि मागणी मधील वाढता फरक हे मुख्य कारण आहे. इलेक्ट्रिक वाहनं, सौर पॅनेल, ५जी इन्फ्रास्ट्रक्चर, सेमीकंडक्टर आणि वैद्यकीय उपकरणांमध्ये चांदीचा वाढता वापर यामुळे उत्पादकांनी सुरक्षित पुरवठ्यासाठी मागणी वाढवली आहे.
सराफा बाजारातील आजचे भाव
आज जीएसटीसह २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,३२,४६० रुपये आहे. तर, चांदी जीएसटीसह १,७८,९५२ रुपये प्रति किलो वर आहे. आज चांदी जीएसटीशिवाय १,७३,७४० रुपये प्रति किलो दरानं उघडली, तर शुक्रवारी चांदी जीएसटीशिवाय १,६४,३५९ रुपये प्रति किलो आणि सोनं जीएसटीशिवाय १,२६,५९१ रुपये प्रति १० ग्रॅम वर बंद झालं होतं.
कॅरेटनुसार आजचे सोन्याचे भाव
आज २३ कॅरेट सोन्याचा भाव देखील २,००३ रुपयांनी महाग होऊन १,२६,०८४ रुपये प्रति १० ग्रॅम दरानं उघडला, तर जीएसटीसह त्याची किंमत आता १,३१,९२९ रुपये झाली आहे. यामध्ये मेकिंग चार्ज अजून जोडलेला नाही. २२ कॅरेट सोन्याची किंमत १,८४२ रुपयांनी वाढून १,१७,७९९ रुपये प्रति १० ग्रॅम वर पोहोचली आहे, आणि जीएसटीसह हा दर १,२१,३३२ रुपये आहे.
१८ कॅरेट सोन्यानं १,५०९ रुपयांची तेजी नोंदवत ९६,४५२ रुपये प्रति १० ग्रॅम चा टप्पा गाठला असून, जीएसटीसह त्याची किंमत ९९,३४५ रुपये प्रति १० ग्रॅम वर पोहोचली आहे. १४ कॅरेट सोन्याचा दर मात्र १,१७६ रुपयांनी कमी झाला आहे, आज तो ७५,२३२ रुपये वर उघडला आणि जीएसटीसह तो ७७,४८८ रुपये वर आलाय.
