Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Gold Silver Price: सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ; गुंतवणूकदारांनी मात्र टाळाव्यात 'या' ५ चुका

Gold Silver Price: सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ; गुंतवणूकदारांनी मात्र टाळाव्यात 'या' ५ चुका

Gold Silver Price: १ ऑक्टोबर २०२५ रोजी सोन्यानं एक नवा विक्रमी उच्चांक गाठला. गेल्या १२ महिन्यांत सोन्याच्या किमतीत ५२.२१% पेक्षा जास्त वाढ झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 14:49 IST2025-10-02T14:49:08+5:302025-10-02T14:49:58+5:30

Gold Silver Price: १ ऑक्टोबर २०२५ रोजी सोन्यानं एक नवा विक्रमी उच्चांक गाठला. गेल्या १२ महिन्यांत सोन्याच्या किमतीत ५२.२१% पेक्षा जास्त वाढ झाली आहे.

Gold Silver Price Record increase in gold and silver prices Investors should avoid these 5 mistakes | Gold Silver Price: सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ; गुंतवणूकदारांनी मात्र टाळाव्यात 'या' ५ चुका

Gold Silver Price: सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ; गुंतवणूकदारांनी मात्र टाळाव्यात 'या' ५ चुका

Gold Silver Price: १ ऑक्टोबर २०२५ रोजी सोन्यानं एक नवा विक्रमी उच्चांक गाठला. दिल्लीमध्ये २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत १.२० लाख रुपयांचा टप्पा ओलांडून १,२०,६२५ रुपयांवर पोहोचली. गेल्या १२ महिन्यांत सोन्याच्या किमतीत ५२.२१% पेक्षा जास्त वाढ झाली आहे.

सोन्याच्या या तेजीमुळे देशभरातील गुंतवणूकदार आकर्षित झाले आहेत, पण या उत्साहामध्येही मूलभूत गोष्टींकडे दुर्लक्ष न करणं आणि सोने-चांदीकडून मिळणाऱ्या परताव्याच्या अपेक्षांवर नियंत्रण ठेवणं गुंतवणूकदारांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक करताना गुंतवणूकदारांनी पुढील ५ सामान्य चुका करणं टाळावं...

₹२४०० वरुन ₹४१ वर आला 'हा' शेअर, आता ट्रेडिंग झालं बंद; संकटात कंपनी, तुमच्याकडे आहे का शेअर?

१. अधिक प्रीमियमवर खरेदी करणे टाळा

डीलरच्या मार्कअप किंवा कलेक्टिबिलिटी चार्जमुळे अवाजवी प्रीमियम देण्यापासून स्वतःला थांबवा. सोने आणि चांदीच्या चालू तेजीमध्ये वाहून जाऊन अतार्किक निर्णय घेऊ नका. केवळ तेव्हाच दीर्घकाळात संपत्ती निर्माण करता येते, जेव्हा विचारपूर्वक गुंतवणूक केली जाते आणि सोने व चांदीतील गुंतवणुकीच्या नियमांचे योग्य पालन केलं जातं.

२. लिक्विडिटीकडे दुर्लक्ष करू नका

मोठे सोने-चांदीचे बार आणि ज्वेलरी साधारणपणे कमी आकर्षक आणि अधिक गुंतागुंतीची विक्री किंमत देतात. सिल्व्हर किंवा गोल्ड ईटीएफ, नाणी किंवा लहान बारसारख्या सहज व्यापार करता येणाऱ्या मालमत्तांच्या तुलनेत यांची विक्री करणं कठीण असू शकतं. म्हणून, गुंतवणूक करताना तुम्ही निवडलेलं स्वरूप विकण्यास सोपं आहे की नाही, याकडे लक्ष द्या.

३. शुद्धता आणि सर्टिफिकेशन निश्चित करा

तुम्ही जे सोनं किंवा चांदी खरेदी करत आहात त्याची शुद्धता निश्चित करण्यावर लक्ष केंद्रित करा. तुम्ही ज्या संस्थेकडून सोनं किंवा चांदी खरेदी करत आहात, त्या संस्थेचे योग्य सर्टिफिकेशन आणि पार्श्वभूमी तपासा. नेहमी हॉलमार्क केलेलं सोनं किंवा चांदीच खरेदी करा.

४. स्टोरेज सुरक्षा आणि खर्चावर लक्ष द्या

स्टोरेज सुरक्षा संबंधित खर्च आणि व्यवस्थापन खर्चाकडे योग्य वेळी लक्ष द्या, कारण यामुळे तुमचा नेट रिटर्न कमी होतो. योग्य सुरक्षा आणि मानसिक शांतता सुनिश्चित करण्यासाठी आपल्या फिजिकल गोल्ड आणि चांदीच्या चांगल्या स्टोरेजची योजना आधीच तयार करणं महत्त्वाचं आहे.

५. रणनीतीशिवाय गुंतवणूक करू नका

सोने-चांदी किंवा संबंधित ईटीएफची कोणतीही खरेदी करण्यापूर्वी, एका प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराशी योग्य चर्चा करून दीर्घकालीन गुंतवणुकीची रणनीती (Long Term Investment Strategy) तयार करणं आवश्यक आहे. गर्दीचं किंवा ट्रेंडचे अनुसरण करणे आणि गुंतवणुकीसाठी धावपळ करणं किंवा चक्राची वेळ निश्चित करण्याचा प्रयत्न करणं योग्य नाही.

Web Title : सोना-चांदी की कीमतों में रिकॉर्ड वृद्धि: निवेशकों को ये 5 गलतियाँ नहीं करनी चाहिए

Web Summary : सोने की कीमतें रिकॉर्ड ऊंचाई पर पहुंच गईं। विशेषज्ञों का कहना है कि निवेशकों को अधिक प्रीमियम देने, तरलता को नजरअंदाज करने और शुद्धता सुनिश्चित करने से बचना चाहिए। सुरक्षित भंडारण और पेशेवर मार्गदर्शन के साथ दीर्घकालिक रणनीति भी सोने और चांदी के निवेश के लिए महत्वपूर्ण है।

Web Title : Record Gold, Silver Prices: Investors Should Avoid These 5 Mistakes

Web Summary : Gold prices hit record highs. Experts advise investors to avoid overpaying premiums, neglecting liquidity, and ensure purity. Secure storage and a long-term strategy with professional guidance are also crucial for successful gold and silver investments.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.