Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > २०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली

२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली

Gold Silver Price: नवीन वर्षात सोन्याचे दर कुठे पोहोचणार, हा गुंतवणूकदारांच्या मनातील मोठा प्रश्न आहे. येत्या काळातही सोन्याच्या दरात मोठी तेजी दिसू शकते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 15:02 IST2025-12-20T14:55:01+5:302025-12-20T15:02:13+5:30

Gold Silver Price: नवीन वर्षात सोन्याचे दर कुठे पोहोचणार, हा गुंतवणूकदारांच्या मनातील मोठा प्रश्न आहे. येत्या काळातही सोन्याच्या दरात मोठी तेजी दिसू शकते.

Gold Silver Price Gold will cross Rs 1 50 lakh in 2026 silver also became expensive by Rs 48000 in a month | २०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली

२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली

Gold Silver Price: नवीन वर्षात सोन्याचे दर कुठे पोहोचणार, हा गुंतवणूकदारांच्या मनातील मोठा प्रश्न आहे. गोल्डमन सॅक्स ग्रुपच्या (Goldman Sachs Group) अहवालानुसार, २०२६ मध्ये सोन्याच्या किमतीतील तेजी कायम राहणार आहे. यासोबतच कच्च्या तेलाच्या किमतीतही मोठी वाढ पाहायला मिळू शकते. विशेष म्हणजे, २०२५ हे वर्ष सोन्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरलं असून या काळात सोन्याचे दर नवीन विक्रम प्रस्थापित करण्यात यशस्वी झालेत.

सोन्याचे दर किती वाढणार?

ब्रोकरेज हाऊसच्या अहवालानुसार, सोन्याचे भाव पुढील वर्षी नवीन उंची गाठण्याची शक्यता आहे. गोल्डमन सॅक्स ग्रुपच्या अहवालानुसार, २०२६ मध्ये सोन्याचा भाव ४,९०० डॉलर प्रति आउन्स म्हणजेच भारतीय बाजारपेठेत सुमारे १,५५,००० रुपये प्रति १० ग्रॅमच्या जवळ पोहोचू शकतो. जर हा अंदाज खरा ठरला, तर गुंतवणुकीच्या दृष्टीनं २०२६ हे वर्ष देखील सोन्यासाठी जबरदस्त ठरेल.

सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ

सध्याची बाजार स्थिती

Ibjarates च्या अहवालानुसार, सोमवारी २४ कॅरेट सोन्याचा दर १,३१,७७९ रुपये प्रति १० ग्रॅमच्या पातळीवर पोहोचला होता. त्याच वेळी चांदीच्या भावानं २ लाख रुपयांचा टप्पा ओलांडला. शुक्रवारी चांदीचा दर २,००,०६७ रुपये प्रति किलो होता. एकीकडे चांदीच्या किमतीत वाढ झाली असली, तरी सोन्याच्या किमतीत गेल्या दोन दिवसांत काहीशी घसरण पाहायला मिळाली आहे.

सोन्याच्या दरात महिनाभरात ८००० रुपयांची वाढ

१९ नोव्हेंबर २०२५ रोजी २४ कॅरेट सोन्याचा भाव १,२३,४४८ रुपये प्रति १० ग्रॅम होता. शुक्रवारी संध्याकाळी हा दर १,३१,७७९ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला. म्हणजेच अवघ्या एका महिन्यात सोन्याच्या किमतीत ८,००० रुपयांची वाढ झाली आहे.

चांदीच्या दरात ४८,००० रुपयांची मोठी उसळी

चांदीच्या किमतीत झालेली वाढ अधिक धक्कादायक आहे. १९ नोव्हेंबर २०२५ रोजी एक किलो चांदीचा भाव १,५८,१२० रुपये होता, जो शुक्रवारी संध्याकाळी २,००,०६७ रुपये प्रति किलोवर पोहोचला. गेल्या एका महिन्यात चांदीच्या किमतीत सुमारे ४८,००० रुपये प्रति किलोची वाढ झाली आहे.

Web Title : 2026 में सोने की कीमत ₹1.5 लाख से ऊपर जाने की संभावना: रिपोर्ट

Web Summary : गोल्डमैन सैक्स के अनुसार, 2026 तक सोने की कीमतें ₹1.5 लाख प्रति 10 ग्राम तक पहुंचने का अनुमान है। चांदी की कीमतों में एक महीने में ₹48,000 की वृद्धि हुई। विशेषज्ञों का अनुमान है कि सोने में लगातार वृद्धि होगी, जिससे यह एक आकर्षक निवेश होगा।

Web Title : Gold Price May Exceed ₹1.5 Lakhs in 2026: Report

Web Summary : Gold prices are projected to reach ₹1.5 lakhs per 10 grams by 2026, according to Goldman Sachs. Silver prices surged by ₹48,000 in a month. Experts predict continued growth in gold, making it a lucrative investment.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.