Lokmat Money > बिझनेस न्यूज > Gold Silver Price 22 August: सोनं महागलं, चांदी सुस्साट; किंमतीत ₹१४४१ ची वाढ, खरेदीपूर्वी पाहा नवे दर

Gold Silver Price 22 August: सोनं महागलं, चांदी सुस्साट; किंमतीत ₹१४४१ ची वाढ, खरेदीपूर्वी पाहा नवे दर

Gold Silver Price 22 August: आज सराफा बाजारातही सोन्या-चांदीच्या दरात जोरदार तेजी दिसून आली. पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 16:05 IST2025-08-22T16:05:08+5:302025-08-22T16:05:08+5:30

Gold Silver Price 22 August: आज सराफा बाजारातही सोन्या-चांदीच्या दरात जोरदार तेजी दिसून आली. पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर.

Gold Silver Price 22 August 2025 Gold becomes expensive silver becomes more expensive Price increases by rs 1441 see new prices before buying | Gold Silver Price 22 August: सोनं महागलं, चांदी सुस्साट; किंमतीत ₹१४४१ ची वाढ, खरेदीपूर्वी पाहा नवे दर

Gold Silver Price 22 August: सोनं महागलं, चांदी सुस्साट; किंमतीत ₹१४४१ ची वाढ, खरेदीपूर्वी पाहा नवे दर

Gold Silver Price 22 August: आज सराफा बाजारातही सोन्या-चांदीच्या दरात जोरदार तेजी दिसून आली. जीएसटीमुळे सराफा बाजारात २४ कॅरेट सोनं १०२२१९ रुपये प्रति १० ग्रॅम दरानं विकलं जात आहे. आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ९५ रुपयांनी वाढून ९९२४२ रुपयांवर उघडला आहे. त्याच वेळी, चांदी १४४१ रुपयांनी प्रति किलोनं वाढली. जीएसटीसह चांदीची किंमत ११७३४८ रुपये प्रति किलो झाली आहे. महागाईचा दबाव, अमेरिकन डॉलरची मंदी आणि अमेरिकेत धोरणात्मक व्याजदरात कपात होण्याची अपेक्षा लक्षात घेता, २०२५ च्या अखेरीपर्यंत सोन्यामध्य तेजी राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आयबीजेएनुसार, गुरुवारी जीएसटीशिवाय चांदीचा दर प्रति किलो ११२४९० रुपये झाला. तर सोनं ९९१४७ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झालं. आता २४ कॅरेट सोनं ८ ऑगस्ट रोजीच्या १०१४०६ रुपयांच्या सर्वोच्च पातळीपेक्षा फक्त २१२४ रुपयांनी स्वस्त झालं आहे.

Airtel नं आपल्या स्वस्त रिचार्ज प्लानमध्ये केला मोठा बदल; पूर्वीपेक्षा कमी मिळणार डेटा, पाहा डिटेल्स

१४ ते २३ कॅरेटचा दर काय?

आज २३ कॅरेट सोन्याचा भावही ९५ रुपयांनी वाढून ९८८४५ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​उघडला. जीएसटीसह त्याची किंमत आता १०१८१० रुपये आहे. यात मेकिंग चार्ज अद्याप समाविष्ट नाही. २२ कॅरेट सोन्याचा भाव ८७ रुपयांनी वाढून ९०९०६ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​पोहोचला. जीएसटीसह तो ९३६३३ रुपये झाला. आज १८ कॅरेट सोन्याचा भाव ७२ रुपयांनी वाढून ७४४३२ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​उघडला आणि जीएसटीसह तो ७६६६४ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​पोहोचला. दुसरीकडे, १४ कॅरेट सोन्याचा भाव आता जीएसटीसह ५९८९८ रुपयांवर पोहोचला आहे.

Web Title: Gold Silver Price 22 August 2025 Gold becomes expensive silver becomes more expensive Price increases by rs 1441 see new prices before buying

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.