Lokmat Money > बिझनेस न्यूज > चांदीच्या दरात मोठी घसरण, सोन्याच्या किंमतीतही झाला बदल; १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार

चांदीच्या दरात मोठी घसरण, सोन्याच्या किंमतीतही झाला बदल; १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार

गगनाला भिडल्यानंतर आज चांदीच्या दरात घसरण झाली आहे. तर सोन्याच्या किमतीत मोठा बदल दिसून येत आहे. पाहा किती आहे सोन्या-चांदीचे नवे दर.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 14:49 IST2025-07-15T14:48:56+5:302025-07-15T14:49:29+5:30

गगनाला भिडल्यानंतर आज चांदीच्या दरात घसरण झाली आहे. तर सोन्याच्या किमतीत मोठा बदल दिसून येत आहे. पाहा किती आहे सोन्या-चांदीचे नवे दर.

Gold Silver Price 15 July Big drop in silver price gold price also changed How much will it cost for 10 grams | चांदीच्या दरात मोठी घसरण, सोन्याच्या किंमतीतही झाला बदल; १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार

चांदीच्या दरात मोठी घसरण, सोन्याच्या किंमतीतही झाला बदल; १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार

गगनाला भिडल्यानंतर आज चांदीच्या दरात घसरण झाली आहे. तर सोन्याच्या किमतीत मोठा बदल दिसून येत आहे. सराफा बाजारात आज एका झटक्यात चांदी १८६७ रुपयांनी स्वस्त झाली. दरम्यान, त्याची किंमत अजूनही १,१२,००० रुपये प्रति किलो झालीये. तर सोन्याची किंमतही ३३९ रुपयांनी घसरून ९७,९६४ रुपये प्रति १० ग्रॅम झाली. आज, मंगळवार, १५ जुलै रोजी, २४ कॅरेट सोने जीएसटीसह १,००,९०२ रुपये प्रति १० ग्रॅम दरानं विकलं जात आहे, तर चांदी १,१५,३६० रुपये प्रति किलो दरानं विकली जात आहे.

आयबीजेएच्या दरांनुसार, २३ कॅरेट सोनंदेखील ३३७ रुपयांनी स्वस्त झाले आणि ते ९७,५७२ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडलं. जीएसटीसह त्याची किंमत आता १,००,४९९ रुपये आहे. त्यात मेकिंग चार्जेसचा समावेश नाही. दागिन्यांसाठी जारी केलेल्या दरांबद्दल बोलायचं झालं तर, २२ कॅरेट सोन्याची किंमत ८९,७३५ रुपये प्रति १० ग्रॅम आहे. जीएसटीसह ती ९२,४२७ रुपये आहे. आज १८ कॅरेट सोन्याची किंमत ७३,४७३ रुपये आहे आणि जीएसटीसह ती ७५,६७७ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचली आहे.

सोने आणि चांदीचे स्पॉट रेट इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनद्वारे (IBJA) जाहीर केले जातात. तुमच्या शहरात १००० ते २००० रुपयांचा फरक असू शकतो. IBJA दिवसातून दोनदा दर जाहीर करते. एकदा दुपारी १२ वाजता आणि दुसऱ्यांदा संध्याकाळी ५ वाजता दर जाहीर केले जातात.

Web Title: Gold Silver Price 15 July Big drop in silver price gold price also changed How much will it cost for 10 grams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.