Gold Silver Price 13 August: आज सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत मोठा बदल झाला आहे. जीएसटीशिवाय २४ कॅरेट सोन्याची किंमत आता प्रति १० ग्रॅम १ लाख रुपयांच्या वर पोहोचली आहे. दरम्यान, ८ ऑगस्ट रोजीच्या १०१४०६ रुपयांच्या सर्वोच्च किमतीपेक्षा ते आता १००० रुपये स्वस्त आहे. तर जीएसटीसह, सराफा बाजारात २४ कॅरेट सोनं प्रति १० ग्रॅम १०३०५८ रुपये दरानं विकलं जात आहे.
आज २४ कॅरेट सोन्याच्या किमतीत ३८७ रुपयांची वाढ झाली आहे. त्याच वेळी, चांदी १५३७ रुपयांनी प्रति किलोनं वाढली आहे. चांदी आता ११४८५० रुपये प्रति किलो दरानं विकली जात आहे. जीएसटीसह चांदीची किंमत ११८२९५ रुपये प्रति किलो झाली आहे. मंगळवारी, जीएसटीशिवाय चांदी ११३३१३ रुपये प्रति किलोवर बंद झाली. तर, सोनं ९९६७० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झालं.
२३ कॅरेट सोन्याचा दर काय?
आज २३ कॅरेट सोन्याचा दरही ३८६ रुपयांनी वाढला आणि तो ९९६५६ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. जीएसटीसह त्याची किंमत आता १०२६४५ रुपये आहे. त्यात अद्याप मेकिंग चार्ज समाविष्ट नाही. २२ कॅरेट सोन्याचा दर ३५४ रुपयांनी वाढून ९१६५२ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. जीएसटीसह तो ९४४०१ रुपये झालाय. आज १८ कॅरेट सोन्याचा भाव २९० रुपयांनी वाढून ७५०४३ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आणि जीएसटीसह तो ७७२९४ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. तर १४ कॅरेट सोन्याचा भाव आता जीएसटीसह ६०२८८ रुपयांवर पोहोचला आहे.
सोनं आणि चांदीच्या स्पॉट किमती इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननं (IBJA) जाहीर केल्या आहेत. तुमच्या शहरात १००० ते २००० रुपयांचा फरक असण्याची शक्यता आहे. IBJA दिवसातून दोनदा दर जाहीर करते. एकदा दुपारी १२ वाजता आणि दुसऱ्यांदा संध्याकाळी ५ वाजता दर जाहीर केले जातात.