Lokmat Money > बिझनेस न्यूज > Gold Rates Today : एका झटक्यात चांदी ₹२,३६६ नं वधारली; सोन्याच्या दर पुन्हा ₹१ लाखांच्या वर, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट्स

Gold Rates Today : एका झटक्यात चांदी ₹२,३६६ नं वधारली; सोन्याच्या दर पुन्हा ₹१ लाखांच्या वर, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट्स

Gold Silver Price 11 July: आज शुक्रवार, ११ जुलै रोजी सोनं आणि चांदीच्या किमतीत मोठी वाढ नोंदवली गेली. सोन्या-चांदीच्या खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 14:03 IST2025-07-11T14:03:29+5:302025-07-11T14:03:29+5:30

Gold Silver Price 11 July: आज शुक्रवार, ११ जुलै रोजी सोनं आणि चांदीच्या किमतीत मोठी वाढ नोंदवली गेली. सोन्या-चांदीच्या खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?

Gold Silver Price 11 July Silver rises by rs 2366 in a single day Gold prices again above rs 1 lakh know the latest rates before buying | Gold Rates Today : एका झटक्यात चांदी ₹२,३६६ नं वधारली; सोन्याच्या दर पुन्हा ₹१ लाखांच्या वर, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट्स

Gold Rates Today : एका झटक्यात चांदी ₹२,३६६ नं वधारली; सोन्याच्या दर पुन्हा ₹१ लाखांच्या वर, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट्स

Gold Silver Price 11 July: आज शुक्रवार, ११ जुलै रोजी सोनं आणि चांदीच्या किमतीत मोठी वाढ नोंदवली गेली. आज सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याच्या किमतीत ४२७ रुपयांची वाढ झाली, तर चांदीच्या दरात एकाच वेळी २३६६ रुपयांची वाढ झाली आणि किंमतीनं सर्वकालीन उच्चांक गाठला. आज २४ कॅरेट सोनं ९७,४७३ रुपयांवर उघडले आणि चांदी १,१०,३०० रुपये प्रति किलो दरानं उघडली. जीएसटीसह २४ कॅरेट सोनं १,००,३९७ रुपये प्रति १० ग्रॅम दरानं विकलं जात आहे, तर चांदी १,१३,६०९ रुपये प्रति किलो दरानं विकली जात आहे.

आयबीजेएच्या दरांनुसार, २३ कॅरेट सोनंदेखील ४२६ रुपयांनी महाग झालं आणि ते प्रति १० ग्रॅम ९७,०८३ रुपयांवर उघडलं. जीएसटीसह त्याची किंमत आता ९९,९९५ रुपये झाली आहे. यामध्ये मेकिंग चार्जेसचा समावेश नाही. दागिन्यांसाठी जारी केलेल्या दरांबद्दल बोलायचं झालं तर, २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम ९५१३ रुपये आहे. आज २० कॅरेट सोन्याची किंमत ८६७५ रुपये आणि १८ कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम ७८९५ रुपये झाली आहे.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननं (IBJA) सोन्या-चांदीचे स्पॉट दर जाहीर केले आहेत. कदाचित तुमच्या शहरात १००० ते २००० रुपयांचा फरक पडत असेल. आयबीजेए दिवसातून दोनदा दर जारी करते. एकदा दुपारी १२ च्या सुमारास, तर दुसऱ्याला सायंकाळी ५ च्या सुमारास दर जाहीर केले जातात.

Web Title: Gold Silver Price 11 July Silver rises by rs 2366 in a single day Gold prices again above rs 1 lakh know the latest rates before buying

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.