Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Gold Silver Price: आज ₹१३,००० पर्यंत महाग झाली चांदी; सोन्याच्या दरात तुफान तेजी, पटापट चेक करा नवे दर

Gold Silver Price: आज ₹१३,००० पर्यंत महाग झाली चांदी; सोन्याच्या दरात तुफान तेजी, पटापट चेक करा नवे दर

Gold Silver Price: आज मंगळवारी सोनं आणि चांदीच्या किमतीत मोठा बदल पाहायला मिळाला असून सराफा बाजारात मोठी तेजी नोंदवण्यात आली आहे. पाहा काय आहेत सोन्या-चांदीचे दर.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 14:27 IST2026-03-10T14:27:34+5:302026-03-10T14:27:34+5:30

Gold Silver Price: आज मंगळवारी सोनं आणि चांदीच्या किमतीत मोठा बदल पाहायला मिळाला असून सराफा बाजारात मोठी तेजी नोंदवण्यात आली आहे. पाहा काय आहेत सोन्या-चांदीचे दर.

Gold Silver Price 10 march 2026 ibja Silver became expensive up to rs 13000 today Gold prices surged check the new rates quickly | Gold Silver Price: आज ₹१३,००० पर्यंत महाग झाली चांदी; सोन्याच्या दरात तुफान तेजी, पटापट चेक करा नवे दर

Gold Silver Price: आज ₹१३,००० पर्यंत महाग झाली चांदी; सोन्याच्या दरात तुफान तेजी, पटापट चेक करा नवे दर

Gold Silver Price: आज मंगळवारी सोनं आणि चांदीच्या किमतीत मोठा बदल पाहायला मिळाला असून सराफा बाजारात मोठी तेजी नोंदवण्यात आली आहे. 'इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन' (IBJA) नुसार, १० मार्च रोजी ९९९ शुद्धतेचं सोनं १,६०,४३६ रुपये प्रति १० ग्रॅम दरानं मिळत आहे. सोमवारी याची किंमत १,५८,६७४ रुपये होती, म्हणजेच आज सोनं १,७६२ रुपयांनी महागलंय. तसंच, ९९५ शुद्धतेच्या सोन्याची किंमत आज १,५९,७९४ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचली असून त्यात १,७५५ रुपयांची वाढ झाली आहे. सोमवारी हे सोनं १,५८,०३९ रुपयांना मिळत होतं.

शुद्धतेनुसार सोन्याचे ताजे दर

दुसरीकडे, ९१६ शुद्धतेचं (२२ कॅरेट) सोनं आज १,४६,९५९ रुपये प्रति १० ग्रॅम दरानं विकलं जात आहे. या सोन्याचा सोमवारी बंद झालेला दर १,४५,३४५ रुपये होता, म्हणजेच आज त्यात १,६१४ रुपयांची वाढ झाली आहे. तसंच, 'bullions.co.in' नुसार, आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात १,७२९ रुपयांची मोठी वाढ होऊन ते १,६२,७२० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचलंय.

SIP माहीत असेलच पण SWP बाबत किती माहिती आहे? गुंतवणूकीपूर्वी जाणून घ्या दोघातील फरक

चांदीच्या दरात १२ हजारांपेक्षा अधिक विक्रमी वाढ

चांदीच्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर, 'आयबीजेए' नुसार आज एक किलो चांदीची किंमत २,७२,८३० रुपये झाली आहे. सोमवारी चांदी २,६०,०५६ रुपये प्रति किलो दरानं विकली जात होती. म्हणजेच आज चांदीच्या दरात १२,७७४ रुपये प्रति किलोची प्रचंड वाढ झाली आहे. तसंच 'bullions.co.in' वर चांदी ९,७२० रुपयांच्या वाढीसह २,७७,६४० रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. विशेष म्हणजे 'आयबीजेए' दिवसातून दोनदा सोने-चांदीचे दर जाहीर करते.

Web Title : सोना, चांदी की कीमतों में उछाल: चांदी ₹13,000 तक महंगी, सोने में तेजी।

Web Summary : आज सोने और चांदी की कीमतों में भारी उछाल देखा गया। IBJA के अनुसार, सोना ₹1,762 प्रति 10 ग्राम बढ़कर ₹1,60,436 पर पहुंच गया। चांदी ₹12,774 प्रति किलो बढ़कर ₹2,72,830 हो गई। Bullions.co.in ने चांदी की कीमतें और भी अधिक बताई हैं।

Web Title : Gold, silver prices surge: Silver up ₹13,000, gold rallies.

Web Summary : Gold and silver prices witnessed a significant surge today. Gold rose by ₹1,762 per 10 grams, reaching ₹1,60,436. Silver skyrocketed by ₹12,774 per kg, hitting ₹2,72,830, according to IBJA. Bullions.co.in reports even higher silver prices.