Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Gold Silver Rate Today: ट्रम्प यांच्या एका विधानाने सोने चमकले; चांदीत २००० रुपयांची घसरण; तुमच्या शहरातील आजचा भाव काय?

Gold Silver Rate Today: ट्रम्प यांच्या एका विधानाने सोने चमकले; चांदीत २००० रुपयांची घसरण; तुमच्या शहरातील आजचा भाव काय?

Gold Silver Rate Today on MCX : मध्यपूर्वेतील तणाव निवळण्याबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या संकेतांनंतर, सोन्याच्या दरांमध्ये मोठी वाढ दिसून येत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 11:28 IST2026-04-01T11:16:11+5:302026-04-01T11:28:43+5:30

Gold Silver Rate Today on MCX : मध्यपूर्वेतील तणाव निवळण्याबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या संकेतांनंतर, सोन्याच्या दरांमध्ये मोठी वाढ दिसून येत आहे.

Gold Rate Today April 1: MCX Gold Crosses ₹1.51 Lakh as Trump Signals End of Middle East Conflict | Gold Silver Rate Today: ट्रम्प यांच्या एका विधानाने सोने चमकले; चांदीत २००० रुपयांची घसरण; तुमच्या शहरातील आजचा भाव काय?

Gold Silver Rate Today: ट्रम्प यांच्या एका विधानाने सोने चमकले; चांदीत २००० रुपयांची घसरण; तुमच्या शहरातील आजचा भाव काय?

Gold Silver Rate Today on MCX : नव्या आर्थिक वर्षाचा पहिला दिवस कमोडिटी बाजारासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. मार्च महिन्यातील प्रचंड चढ-उतारानंतर आज, १ एप्रिल रोजी सोन्याच्या किमतीत मोठी वाढ पाहायला मिळाली आहे, तर दुसरीकडे चांदीच्या दरात काहीशी घसरण झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याने १,५१,५५० रुपये प्रति १० ग्रॅमचा टप्पा गाठून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान आणि जागतिक परिणाम
मध्य पूर्वेतील तणाव कमी होण्याचे संकेत मिळाल्याने सोन्याच्या किमतीला बळकटी मिळाली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्य पूर्वेतील युद्ध लवकरच संपेल असे सुतोवाच केले आहे. पुढील दोन ते तीन आठवड्यांत अमेरिकन सैन्य इराणमधून बाहेर पडेल, या विधानामुळे बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. युद्धामुळे कच्चे तेल आणि डॉलर वधारल्याने कमोडिटी बाजारावर दबाव होता, जो आता कमी होताना दिसत आहे.

MCX वरील आजची स्थिती (१ एप्रिल २०२६)

धातू सध्याचा दर (MCX) २४ तासांतील बदल 
सोने १,५१,५५० (प्रति १० ग्रॅम) + ७०० पेक्षा जास्त वाढ 
चांदी २,३९,६२५ (प्रति किलो) १,८२१ घसरण 

प्रमुख शहरांतील सोन्या-चांदीचे दर (२४ कॅरेट)

  • आज देशातील प्रमुख शहरांत सोन्याच्या किमतीत किरकोळ फरक पाहायला मिळत आहे.
  • मुंबई: २४ कॅरेट सोन्याचा भाव १,४९,५२० रुपये, तर २२ कॅरेटसाठी १,३७,०६० रुपये मोजावे लागत आहेत.
  • दिल्ली: राजधानीत २४ कॅरेट सोने १,४९,६७० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचले आहे.
  • पुणे/कोलकाता: कोलकात्यात सोन्याचा भाव १,४९,५२० रुपये असून चांदी २,५०,१०० रुपये** प्रति किलो आहे.
  • चेन्नई: येथे २४ कॅरेट सोने १,४९,१२० रुपये असून चांदी २,४९,९०० रुपये आहे.

वाचा - नव्या आर्थिक वर्षाचा दणक्यात श्रीगणेश! सेन्सेक्स १८०० अंकांनी उसळला, निफ्टीही तेजीत, गुंतवणूकदारांची चांदी

चांदीच्या दरात का झाली घसरण?
सोन्यामध्ये तेजी असली तरी चांदीमध्ये एका दिवसात १,८२१ रुपयांची घट झाली आहे. मंगळवारी चांदी २,४१,४४६ रुपयांवर बंद झाली होती, जी आज २,३९,६२५ रुपयांवर आली आहे. औद्योगिक मागणीत झालेली तात्पुरती घट आणि जागतिक बाजारातील नफावसुली हे याचे मुख्य कारण मानले जात आहे.

 

Web Title : ट्रंप के बयान से सोना चमका; चांदी लुढ़की; आपके शहर में दरें?

Web Summary : ट्रंप के मध्य पूर्व तनाव कम करने के संकेत के बाद सोने की कीमतें बढ़ीं। एमसीएक्स सोना ₹1,51,550/10 ग्राम पर, चांदी ₹1,821 गिरकर ₹2,39,625/किग्रा पर आई, क्योंकि औद्योगिक मांग घटी। शहर की दरें थोड़ी भिन्न हैं।

Web Title : Trump's Statement Sparks Gold Surge; Silver Plummets; City Rates?

Web Summary : Gold prices soared after Trump hinted at easing Middle East tensions. MCX gold hit ₹1,51,550/10g, while silver fell ₹1,821 to ₹2,39,625/kg due to industrial demand dip. City rates vary slightly.