Gold Silver Rate Today: सोन्याच्या दरात आज घसरण झाली असली तरी चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. आज २ जुलै रोजी २४ कॅरेट सोन्याचा भाव १७३ रुपये प्रति १० ग्रॅमनं घसरून ९७,२५७ रुपये झाला. जीएसटीसह प्रति दहा ग्रॅम सोन्याचा दर एक लाख रुपयांच्या पुढे गेला आहे. तर दुसरीकडे चांदीचा भाव १०६३ रुपयांनी घसरून १०५९०० रुपये प्रति किलो ग्रॅम झाला. जीएसटीमुळे २४ कॅरेट सोन्याचा दर १००१७४ रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीचा दर १०९०७७ रुपये प्रति किलो झालाय.
आयबीजेएच्या दरांनुसार, २३ कॅरेट सोन्याचा भावही १७२ रुपयांनी घसरून ९६,८६८ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडला. त्याच वेळी, २२ कॅरेट सोन्याचा सरासरी स्पॉट प्राईस १५९ रुपयांनी घसरून ८९,०८७ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडली. १८ कॅरेट सोन्याचा भावही १३० रुपयांनी स्वस्त होऊन ७२,९४३ रुपये प्रति १० ग्रॅमवर आला आहे. तर, १४ कॅरेट सोन्याचा भाव १०२ रुपयांनी घसरुन ५६,८९५ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे. यामध्ये जीएसटी आणि मेकिंग चार्ज समाविष्ट नाहीत.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) ने सोने आणि चांदीचे स्पॉट रेट जाहीर केले आहेत. यावर GST लागू नाही. तुमच्या शहरात १००० ते २००० रुपयांचा फरक असण्याची शक्यता आहे. IBJA दिवसातून दोनदा दर जाहीर करते. एकदा दुपारी १२ वाजता आणि दुसऱ्यांदा संध्याकाळी ५ वाजता दर जाहीर केले जातात.