Lokmat Money > बिझनेस न्यूज > सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर

सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर

Gold Silver Price Today 19 June: सोन्या-चांदीमधील तेजी आता कमी होऊ लागली आहे. सराफा बाजारात आज सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 15:33 IST2025-06-19T15:32:34+5:302025-06-19T15:33:50+5:30

Gold Silver Price Today 19 June: सोन्या-चांदीमधील तेजी आता कमी होऊ लागली आहे. सराफा बाजारात आज सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली.

gold prices 19 june 2025 have decreased silver has become cheaper by rs 2069 in a single moment see what are the new rates | सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर

सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर

Gold Silver Price Today 19 June: सोन्या-चांदीमधील तेजी आता कमी होऊ लागली आहे. सराफा बाजारात आज सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली. मात्र, चांदी एका झटक्यात २०६९ रुपयांनी स्वस्त झाली असून ती १०७३४३ रुपयांवर आली. आज सोन्याचा भाव ६८६ रुपयांनी घसरून ९८,७६८ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. जीएसटीमुळे २४ कॅरेट सोन्याची किंमत १०१७३१ रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीची किंमत ११०५६३ रुपये प्रति किलो आहे.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननं (आयबीजेए) सोन्या-चांदीचे स्पॉट दर जाहीर केलेत. त्यात जीएसटीचा समावेश नाही. कदाचित तुमच्या शहरात १००० ते २००० रुपयांचा फरक असू शकेल. आयबीजेए दिवसातून दोनदा दर जारी करते. एकदा दुपारी १२ च्या सुमारास, तर दुसऱ्याला सायंकाळी ५ च्या सुमारास दर जारी केले जातात.

₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?

२२ कॅरेट सोन्याचे दर काय?

आयबीजेएच्या दरानुसार आज म्हणजेच गुरुवार, १९ जून रोजी २३ कॅरेट सोन्याचा भाव ६८३ रुपयांनी घसरून ९८३७३ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. तर २२ कॅरेट सोन्याचा सरासरी स्पॉट भाव ६२९ रुपयांनी घसरून ९०४७१ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. १८ कॅरेट सोन्याचा भाव ५१५ रुपयांनी कमी झाला असून त्याची किंमत ७४०७६ रुपये प्रति १० ग्रामवर आला. १४ कॅरेट सोन्याचा भाव ४०२ रुपयांनी कमी होऊन ५७,७७९ रुपये झाला. यावर जीएसटी आणि मेकिंग चार्ज जोडलेला नाही.

Web Title: gold prices 19 june 2025 have decreased silver has become cheaper by rs 2069 in a single moment see what are the new rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.