सोन्याच्या दरात आज मोठी घसरण पाहायला मिळाली. शुक्रवारी २४ कॅरेट सोन्याचा भाव ८०५ रुपयांनी कमी झालाय. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननं शुक्रवारी जाहीर केलेल्या दरानुसार २४ कॅरेट सोन्याचा भाव ९७,३५८ रुपये प्रति १० ग्रॅम आहे. तर काल संध्याकाळी १० ग्रॅमचा दर ९८,१६३ रुपये होता.
चांदीचा दर काय?
चांदीचा भाव आज १०४६१० रुपये प्रति किलो होता. गुरुवारी संध्याकाळी चांदीचा दर १०४६७५ रुपये होता. सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. अशा तऱ्हेने सोन्याच्या दरात कपात झाल्यानं सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
ट्रम्प आणि मस्क यांच्यात वाद; Tesla चे शेअर्स जोरदार आपटले, १५२ अब्ज डॉलर्स बुडाले
२३ कॅरेट सोन्याची किंमत किती?
इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननं जाहीर केलेल्या दरांनुसार आज २३ कॅरेट सोन्याचा भाव ९६,९६८ रुपये प्रति १० ग्रॅम आहे. काल संध्याकाळी ५ वाजता तो ९७,७७० रुपये प्रति १० ग्रॅम होता. आज १० ग्रॅम सोन्याच्या दरात कालच्या तुलनेत ८०२ रुपयांनी घट झाली आहे.
काय आहे २२ कॅरेट सोन्याची किंमत?
शुक्रवारी २२ कॅरेट सोन्याचा सरासरी स्पॉट भाव ८९,१८० रुपये प्रति १० ग्रॅम होता. तर दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास १८ कॅरेट सोन्याचा भाव ७३,०१९ रुपये प्रति १० ग्रॅम आणि १४ कॅरेट सोन्याचा भाव ५६,९६४ रुपये प्रति १० ग्रॅम आहे. यामध्ये जीएसटीचा समावेश नाही.
इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने हे दर जाहीर केले आहे. आपल्या शहरातील दरात १००० ते २००० रुपयांची तफावत असू शकते. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनकडून दिवसातून दोनवेळा हा दर जारी केला जातो. पहिल्यांदा १२ वाजता आणि दुसऱ्यांदा ५ वाजता दर जाहीर केले जातात.