Lokmat Money > बिझनेस न्यूज > ट्रम्प यांच्या एका प्लॅनमुळे सोने होणार कवडीमोल? क्रिप्टोकरन्सी होईल मजबूत? काय आहेत शक्यता?

ट्रम्प यांच्या एका प्लॅनमुळे सोने होणार कवडीमोल? क्रिप्टोकरन्सी होईल मजबूत? काय आहेत शक्यता?

cryptocurrency Booming in Trump Era: डोनाल्ड ट्रम्प निवडणूक जिंकल्यापासून सोन्याची किंमत सातत्याने घसरत आहेत. भविष्यात सोन्याची किंमत आणखी कमी होऊ शकते का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 13:06 IST2024-12-12T13:05:38+5:302024-12-12T13:06:14+5:30

cryptocurrency Booming in Trump Era: डोनाल्ड ट्रम्प निवडणूक जिंकल्यापासून सोन्याची किंमत सातत्याने घसरत आहेत. भविष्यात सोन्याची किंमत आणखी कमी होऊ शकते का?

gold price may fall in donald trump second era cryptocurrency can booming | ट्रम्प यांच्या एका प्लॅनमुळे सोने होणार कवडीमोल? क्रिप्टोकरन्सी होईल मजबूत? काय आहेत शक्यता?

ट्रम्प यांच्या एका प्लॅनमुळे सोने होणार कवडीमोल? क्रिप्टोकरन्सी होईल मजबूत? काय आहेत शक्यता?

cryptocurrency Booming in Trump Era: सोने म्हणजे भारतीयांचा जीव की प्राण. फुटका का असेना पण प्रत्येक महिलेच्या अंगावर एकतरी सोन्याचा दागिना पाहायला मिळतो. गेल्या वर्षभरात सोन्याने किमतीचा उच्चांक गाठला आहे. मात्र, तरीही सोने खरेदीमध्ये कुठलीही घट झालेली नाही. पण, येत्या काळात सोन्याची किंमत कवडीमोल होईल असं म्हटलं तर विश्वास बसेल का? नवीन वर्षात डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. ट्रम्प यांनी निवडणूक जिंकल्यापासून सोने आणि क्रिप्टोकरन्सी चर्चेत आहेत. ५ नोव्हेंबर रोजी ट्रम्प यांच्याकडून अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली. तेव्हापासून, सोने घसरत असताना, क्रिप्टोकरन्सीच्या किमती गगनाला भिडत आहेत. गेल्या एका महिन्यात क्रिप्टोकरन्सीचे दर दुपटीने वाढले आहेत. तर सोन्याच्या भावात घसरण झाली आहे.

गुंतवणूकदारांचा सोन्यावर विश्वास
सोने ही गुंतवणूकदारांची पहिली पसंती आहे. ही निवड सर्वसामान्य गुंतवणूकदारांचीच नाही, तर अनेक देश सोन्याचा साठा वाढवत आहेत. त्यात भारत आणि चीन प्रमुख आहेत. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे सोन्याकडे सुरक्षित मालमत्ता म्हणून पाहिले जाते. कुठल्याही आर्थिक संकटात सोने वापरले जाऊ शकते. त्याचबरोबर भारतीयांमध्ये सोन्याबद्दलचे प्रेम जास्त आहे. सणासुदीपासून लग्नसराईपर्यंत याला खूप मागणी असते. अनेक गुंतवणूकदारही सोन्यात गुंतवणूक करतात. मात्र, काही काळापासून त्याच्या किमतीत प्रचंड चढ-उतार होत आहेत.

सोन्याची किमती का घसरतायेत?
जगातील अनेक देशांमध्ये, व्यावसायिक पेमेंट यूएस डॉलरमध्ये केले जाते. डोनाल्ड ट्रम्प हे डॉलरचे समर्थक आहे. त्यांना डॉलर अधिक मजबूत करायचा आहे. त्यांच्या पहिल्या कार्यकाळातही त्यांनी हे काम केले आहे. जसजसा डॉलर मजबूत होतो तसतसा सोन्याचा भाव घसरतो. अशा परिस्थितीत ट्रम्प यांच्या राजवटीत डॉलर जितका मजबूत असेल तितकी सोन्याची किंमत कमी होईल.

ट्रम्प यांनी निवडणूक जिंकल्यानंतर याचे उदाहरण आपण यापूर्वी पाहिले आहे. ट्रम्प यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वीच डॉलरच्या मूल्याने रुपयाला खूप मागे टाकले आहे. जगातील अनेक चलनांच्या तुलनेत डॉलरचे मूल्य वाढले आहे. याचा परिणाम असा झाला की जगात सोने खूपच स्वस्त झाले. भारतात धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्याने ८० हजार रुपयांचा टप्पा ओलांडला होता. त्याची किंमत ७० हजार रुपयांच्या जवळपास पोहोचली होती.

क्रिप्टोकरन्सीची स्थिती काय आहे?
ट्रम्प निवडणूक जिंकल्यानंतर क्रिप्टोकरन्सीमध्ये मोठी वाढ झाली आहे. एका महिन्यात क्रिप्टोकरन्सीने सोन्यापेक्षा जास्त परतावा दिला आहे. बिटकॉइनने १ लाख डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. डॉगकॉनने दुप्पट परतावा दिला आहे. इतर क्रिप्टोकरन्सी देखील गुंतवणूकदारांना चांगला परतावा देत आहेत.

क्रिप्टोची किंमत का वाढत आहे?
क्रिप्टोकरन्सी वाढण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे ट्रम्प हे त्याचे समर्थक आहेत. दुसरीकडे, जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती इलॉन मस्क देखील क्रिप्टोकरन्सीचे खंदे समर्थक मानले जातात. अमेरिकेत झालेल्या या निवडणुकीत मस्क यांनी ट्रम्प यांना पाठिंबा दिला होता. ट्रम्प यांनी मस्क यांना सरकारी कार्यक्षमता विभागाचे प्रमुख बनवले आहे.

मस्क व्यतिरिक्त ट्रम्प यांनी अमेरिकन ब्रोकरेज आणि इन्व्हेस्टमेंट बँक कँटर फिट्झगेराल्डचे प्रमुख हॉवर्ड लुटनिक यांना कॉमर्स सचिवपदी नामनिर्देशित केले आहे. लुटनिक हे देखील क्रिप्टोकरन्सीचे मोठे समर्थक आहे. ट्रम्प यांनी यूएस सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनच्या (एसईसी) प्रमुखपदी पॉल ऍटकिन्स यांच्या नावाचाही प्रस्ताव ठेवला आहे. सध्याचे अध्यक्ष गॅरी जेन्सलर यांच्या विपरीत, ऍटकिन्स यांचा क्रिप्टोकरन्सीच्या बाबतीत सकारात्मक दृष्टीकोन आहे.

Web Title: gold price may fall in donald trump second era cryptocurrency can booming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.