भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात शुक्रवारीही घसरण दिसून आली. सोन्याचा भाव सलग तिसऱ्या दिवशी घसरला आणि प्रति दहा ग्रॅम 170 रुपयांनी घसरून 78,130 रुपयांवर आला. तर चांदीचा भाव सलग दुसऱ्या दिवशी घसरला आणि प्रति किलो 1,850 रुपयांनी कमी होऊन 88,150 रुपयांवर आला. देशांतर्गत बाजारात ज्वेलर्सकडून मागणी कमी झाल्यामुळे सोन्याच्या दरात थोडी घसरण झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
दिल्लीत सोन्याचांदीचा दर -
दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव सलग तिसऱ्या दिवशी घसरून 78,130 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला आहे. ऑल इंडिया बुलियन असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, ज्वेलर्स आणि स्टॉकिस्टच्या कमकुवत भूमिकेमुळे सोन्याचे भाव 170 रुपये प्रति दहा ग्रॅमने घसरले आहेत. तर गुरुवारी शेवटच्या ट्रेडिंग सत्रात हा भाव 78,300 रुपये प्रति दहा ग्रॅम होता. या कालावधीत, 99.5% शुद्धता असलेल्या सोन्याचा भावही 170 रुपयांनी कमी होऊन 77,730 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला, जो गेल्या ट्रेडिंग सत्रात 77,900 रुपये होता. याच वेळी, चांदीचा भावही सलग दुसऱ्या दिवशी घसरला आणि तो 1,850 रुपयांनी घसरून 88,150 रुपये प्रति किलोवर आला. गुरुवारी शेवटच्या ट्रेडिंग सत्रात तो 90,000 रुपयांवर होता.
सोन्या-चांदीच्या दराची आठवडाभराची आकडेवारी -
सोमवार - सोनं 1,150 रुपयांनी घसरलं, चांदी 300 रुपयांनी घसरली.
मंगळवार - सोनं 950 रुपयांनी वधारलं, चांदी 1,000 रुपयांनी घसरली
बुधवार - सोनं 200 रुपयांनी घसरलं, चांदी 500 रुपयांनी वधारली
गुरूवार - सोनं 800 रुपयांनी घसरलं, चांदी 2,000 रुपयांनी घसरली
शुक्रवार - सोनं 170 रुपयांनी घसरलं, चांदी 1,850 रुपयांनी घसरली.
मंगळवार वगळता आठवडाभरात सोन्याचा भाव एकूण 1370 रुपये प्रति दहा गॅमने घसरला. तर चांदीच्या दरात आठवडाभरात बुधवार वगळता एकूण 4650 रुपयांची घसरण दिसून आली आहे.