Gold-Silver Rate: देशांतर्गत बाजारात सोने-चांदीच्या दरांमध्ये सलग चौथ्या दिवशी मोठी घसरण झाली आहे. आज 24 कॅरेट सोन्याची किंमत 1,558 रुपयांनी घसरून ₹1,21,366 प्रति 10 ग्रॅम झाली आहे. तर, चांदी ₹3,083 रुपयांनी घसरुन ₹1,51,850 प्रति किलो (बिना जीएसटी) वर आली.
अमेरिकन मध्यवर्ती बँक, फेडरल रिझर्व्हने व्याजदर कपात करण्यास दिलेल्या विलंबामुळे आणि डॉलर निर्देशांकात झालेल्या वाढीमुळे, न्यू यॉर्क ते मुंबईपर्यंत सोन्याच्या किमतीत नाट्यमय घट झाली. परदेशी बाजारपेठेतदेखील सोन्याच्या किमती प्रति औंस $66 ने घसरल्या आहेत.
सोमवारी (मागील सत्रात):
सोने (बिना जीएसटी): ₹1,22,924/10 ग्रॅम
चांदी (बिना जीएसटी): ₹1,54,933/किलो
ऑल-टाइम हाईपासून सोन्यात 9,508 रुपये आणि चांदीत 26,250 रुपयांची पडझड
24 कॅरेट सोने 17 ऑक्टोबरच्या ₹1,30,874 च्या ऑल-टाइम हाईपासून आतापर्यंत ₹9,508 रुपयांनी स्वस्त
चांदी 14 ऑक्टोबरच्या ₹1,78,100 च्या हाईपासून ₹26,250 रुपयांनी स्वस्त
भारत बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) दररोज दोनदा- दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 5 वाजता अधिकृत दर जाहीर करते.
कॅरेटनिहाय सोन्याचे आजचे दर (बिना मेकिंग चार्जेस)
23 कॅरेट गोल्ड
₹1,20,880 प्रति 10 ग्रॅम (1,558 रुपयांनी घसरण)
जीएसटीसह: ₹1,24,506
22 कॅरेट गोल्ड
₹1,11,171 प्रति 10 ग्रॅम (1,427 रुपयांनी घसरण)
जीएसटीसह: ₹1,14,506
18 कॅरेट गोल्ड
₹91,025 प्रति 10 ग्रॅम (1,168 रुपयांची घसरण)
जीएसटीसह: ₹93,755
14 कॅरेट गोल्ड
₹70,999 प्रति 10 ग्रॅम (912 रुपयांची घसरण)
जीएसटीसह: ₹73,128
या वर्षातील वाढ
सध्या घसरण दिसत असली तरी वर्षभरातील एकूण वाढ पाहता:
सोने: ₹45,626 प्रति 10 ग्रॅम वाढ
चांदी: ₹65,833 प्रति किलो वाढ
