Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > ट्रम्प यांच्या धोरणांचा डॉलरला फटका! वर्षभरात ९% घसरण; जागतिक बँकांकडून 'डी-डॉलरायझेशन'चा वेग वाढला

ट्रम्प यांच्या धोरणांचा डॉलरला फटका! वर्षभरात ९% घसरण; जागतिक बँकांकडून 'डी-डॉलरायझेशन'चा वेग वाढला

De-Dollarisation : तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, डॉलरच्या विनिमयीकरणाची ही प्रक्रिया आता केवळ आर्थिक प्रयोग राहिलेली नाही, तर ती एक राजकीय गरज आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 12:34 IST2026-01-27T11:42:32+5:302026-01-27T12:34:18+5:30

De-Dollarisation : तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, डॉलरच्या विनिमयीकरणाची ही प्रक्रिया आता केवळ आर्थिक प्रयोग राहिलेली नाही, तर ती एक राजकीय गरज आहे.

Gold Crosses $5,000 Milestone Is De-dollarisation Weakening the US Dollar? | ट्रम्प यांच्या धोरणांचा डॉलरला फटका! वर्षभरात ९% घसरण; जागतिक बँकांकडून 'डी-डॉलरायझेशन'चा वेग वाढला

ट्रम्प यांच्या धोरणांचा डॉलरला फटका! वर्षभरात ९% घसरण; जागतिक बँकांकडून 'डी-डॉलरायझेशन'चा वेग वाढला

De-Dollarisation : डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या सत्तेवर दुसऱ्यांदा आल्यानंतर त्यांनी आपल्या आक्रमक धोरणांनी जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा धक्का दिला आहे. पण, याचे परिणाम आता खुद्द अमेरिकेलाही भोगावा लागत आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत अनेक दशकांपासून एकछत्री अंमल गाजवणाऱ्या अमेरिकन डॉलरला आता 'सोन्याचे' ग्रहण लागण्याची चिन्हे आहेत. सोमवारी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याने प्रति औंस ५,००० डॉलर्सचा ऐतिहासिक टप्पा पार केला, तर दुसरीकडे अमेरिकन डॉलर चार महिन्यांच्या नीचांकावर घसरला. जागतिक मध्यवर्ती बँकांनी डॉलरवरील विश्वास कमी करून आपल्या तिजोऱ्या सोन्याने भरण्यास सुरुवात केली असून, या प्रक्रियेला 'डी-डॉलरायझेशन' असे संबोधले जात आहे.

डॉलचा टक्का घसरला, सोन्याची चकाकी वाढली
आकडेवारीनुसार, १९९९ मध्ये जागतिक परकीय चलन साठ्यात अमेरिकन डॉलरचा वाटा ७१% होता, जो २०२४ पर्यंत ५५.५% इतका खाली आला आहे. २०२५ या वर्षात डॉलरमध्ये ९% ची मोठी घसरण झाली, जी गेल्या दशकातील सर्वात मोठी पडझड मानली जाते.

का होतोय डॉलरचा त्याग?
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची आक्रमक व्यापारी धोरणे आणि निर्बंधांची भीती यामुळे अनेक देशांनी आपल्या संपत्तीचे विकेंद्रीकरण सुरू केले आहे. केवळ एकाच चलनात (डॉलर) सर्व संपत्ती ठेवणे आता जोखमीचे वाटू लागले आहे.

भारतीय रिझर्व्ह बँक झाली मालामाल!
आरबीआयनेही या जागतिक प्रवाहात आपली भूमिका चोख बजावली आहे. १६ जानेवारी २०२६ च्या आकडेवारीनुसार,

  • भारताकडे सध्या ८८० टन सोन्याचा साठा आहे.
  • गेल्या १० महिन्यांत भारताच्या परकीय चलन साठ्यात ४ अब्ज डॉलर्सची वाढ झाली. त्यातील एक-तृतीयांश वाढ केवळ सोन्याच्या वाढलेल्या किमतींमुळे झाली आहे.
  • गेल्या वर्षभरात आरबीआयच्या डॉलर मालमत्तेचे मूल्य ५% वाढले, तर सोन्याच्या साठ्याचे मूल्य तब्बल ७०% नी वाढले आहे.


जगात सोने खरेदीची 'चढाओढ'

आपल्या अर्थव्यवस्थेला 'ट्रम्प-प्रूफ' करण्यासाठी २०२५ मध्ये अनेक देशांनी मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी केले.

देशसोने खरेदी (टन) 
पोलंड ९५ टन
कझाकिस्तान४९ टन 
ब्राझील ४३ टन 
तुर्की २७ टन 
चीन २६ टन 

वाचा - लॉकरमध्ये दागिने ठेवा, पण 'या' वस्तूंना सक्त मनाई! RBI ने बदलले नियम; अन्यथा होईल कारवाई

युरोपचा 'डॉलर' एक्झिट प्लॅन?
नोमुरा या संस्थेच्या मते, जर युरोपीय देशांनी त्यांचे १०.४ ट्रिलियन डॉलर्सचे अमेरिकन बॉन्ड्स विकण्यास सुरुवात केली, तर अमेरिकन अर्थव्यवस्थेसाठी तो मोठा धक्का असेल. ट्रम्प यांनी यावर 'उलट कारवाई' करण्याची धमकी दिली असली तरी, जगाचा कल आता स्थिर अशा सोन्याकडे वळताना दिसत आहे.

Web Title : ट्रंप की नीतियों से डॉलर पर असर; डी-डॉलरीकरण में तेज़ी।

Web Summary : ट्रंप की नीतियों से डॉलर कमजोर हुआ, एक साल में 9% गिरा। वैश्विक बैंकों ने सोने का भंडार बढ़ाया, डी-डॉलरीकरण में तेजी आई। भारत का स्वर्ण भंडार भी बढ़ा।

Web Title : Trump's policies hit dollar; De-dollarization accelerates globally.

Web Summary : Trump's policies weaken the dollar, falling 9% in a year. Global banks increase gold reserves, accelerating de-dollarization. India's gold holdings rise amid this shift.