lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > अरे व्वा! लसीकरणामुळे सोन्याचे दर घसरले, जाणून घ्या लेटेस्ट दर...

अरे व्वा! लसीकरणामुळे सोन्याचे दर घसरले, जाणून घ्या लेटेस्ट दर...

सोन्याचा दर ५०० रुपये तर चांदीच्या दरात १७०० रुपयांची घसरण झाली आहे.

By मोरेश्वर येरम | Published: January 16, 2021 07:48 PM2021-01-16T19:48:27+5:302021-01-16T19:50:28+5:30

सोन्याचा दर ५०० रुपये तर चांदीच्या दरात १७०० रुपयांची घसरण झाली आहे.

gold and sliver rate 16 jan 2021 update | अरे व्वा! लसीकरणामुळे सोन्याचे दर घसरले, जाणून घ्या लेटेस्ट दर...

अरे व्वा! लसीकरणामुळे सोन्याचे दर घसरले, जाणून घ्या लेटेस्ट दर...

Highlightsसोने आणि चांदीच्या दरात पुन्हा घसरणसोन्याचा भाव ५०० रुपयांची घसरलाचांदीचा भाव १७०० रुपयांनी घसरला

देशात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. नेमकं याच पार्श्वभूमीवर आज सोनं आणि चांदीच्या दरातची घट झाली आहे. सोन्याचा दर ५०० रुपये तर चांदीच्या दरात १७०० रुपयांची घसरण झाली आहे.

मुंबईत सोन्याचा भाव आता ४७ हजार ९१० रुपयांवर आला आहे. तर चांदीचा दर एका किलोमागे ६४,९८० रुपये इतका झाला आहे. कोरोना लसीकरण आणि अमेरिकेतील राजकीय अस्थिरता निवळल्याचा हा परिणाम असल्याचं बोललं जात आहे. 

गेल्या दोन दिवसांपासून दोन्ही धातूंच्या किमतीत घसरण सुरूच आहे. MCX च्या माहितीनुसार, गुरुवारी सोन्याचा भाव प्रति दहा ग्रम ४९,२२१ रुपयांवर बंद झाला होता. त्यानंतर शुक्रवारी सकाळी त्यात १३३ रुपयांची घसरण होऊन ४९,०८८ रुपये इतका झाला होता. त्यानंतर सोन्याच्या भावात किंचत वाढ होऊन ४९,१४५ रुपये इतका झाला होता. 

गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार शनिवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम मागे ४७,९१० रुपये इतका झाला आहे. तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४८,९१० रुपये इतका झाला आहे. चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४६०८० रुपये असून २४ कॅरेटचा भाव ५०२७० रुपये आहे. कोलकात्यात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४८४१० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ५१११० रुपये आहे. 
 

Web Title: gold and sliver rate 16 jan 2021 update

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.