Gold Silver Price 3 Nov: लग्नसराईचा हंगाम सुरू होताच सोन्या-चांदीच्या किंमतीत पुन्हा एकदा तेजी दिसून आले आहेत. आज, म्हणजेच सोमवार, ३ नोव्हेंबर रोजी, सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा बदल दिसून आला आहे. २४ कॅरेट सोन्याचा भाव आता जीएसटीसह ₹१,२४,७४६ प्रति १० ग्रॅम झाला आहे, तर चांदीचा दर जीएसटीसह ₹१,५४,०८८ प्रति किलो वर पोहोचलाय.
विक्रमी उच्चांकावरून घसरण
बाजारात तेजी असली तरी, सोने-चांदीचे भाव त्यांच्या पूर्वीच्या विक्रमी उच्चांकापेक्षा कमी झाले आहेत. सोनं १७ ऑक्टोबरच्या ऑल टाइम हाय दरापेक्षा ₹५,७६४ रुपयांनी स्वस्त झालंय. चांदीचे दर १४ ऑक्टोबरच्या ऑल टाइम हाय दरापेक्षा ₹२८,५०० रुपयांनी घसरलेत.
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
आयबीजेएनुसार नवे दर काय?
इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या (IBJA)माहितीनुसार, ३१ ऑक्टोबर रोजी २४ कॅरेट सोन्याचा दर जीएसटीशिवाय ₹१,२०,७७० वर बंद झाला होता, तर चांदी जीएसटीशिवाय ₹१,४९,१२५ प्रति किलो दराने बंद झाली होती. आज, सोमवार, ३ नोव्हेंबर रोजी, सोन्याचा दर जीएसटीशिवाय ₹१,२१,११३ प्रति १० ग्रॅमने उघडला, तर चांदी ₹१,४९,६६० वर खुली झाली. आयबीजेए दिवसातून दोन वेळा म्हणजे दुपारी १२ आणि सायंकाळी ५ च्या आसपास दर जाहीर करते.
कॅरेटनुसार सोन्याच्या भावात वाढ
२३ कॅरेट सोन्याचा भाव ₹३४३ रुपयांनी महाग होऊन ₹१,२०,६२८ प्रति १० ग्रॅम वर उघडला. जीएसटीसह याची किंमत ₹१,२४,२४६ झाली आहे. यात मेकिंग चार्ज जोडलेला नाही.
२२ कॅरेट सोन्याची किंमत ₹३१५ रुपयांनी वाढून ₹१,१०,९४० प्रति १० ग्रॅम वर पोहोचली आहे. जीएसटीसह हा दर ₹१,१४,२६८ झालाय.
१८ कॅरेट सोन्यात ₹२५७ रुपयांची तेजी असून, त्याचा भाव ₹९०,८३५ प्रति १० ग्रॅम झालाय. जीएसटीसह याची किंमत ₹९३,५६० प्रति १० ग्रॅम आहे.
या वर्षातील मोठी दरवाढ
या वर्षात सोन्या-चांदीच्या दरानं मोठी झेप घेतलीये. सोनं ₹४५,३७३ प्रति १० ग्रॅमनं महागलं, तर चांदी ₹६३,५८३ प्रति किलोनं महाग झाली आहे.
