Gold and Silver Price Today: गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठी घसरण होत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सोन्याच्या दरात ११ हजारांपेक्षा अधिक घसरण झाली आहे. गुरुवारीदेखील दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या दरात २१७ रूपये प्रति १० ग्रामची घसरण झाली. यानंतर सोन्याचे दर आता ४४,३७२ रूपयांवर आले आहेत. तर दुसरीकडे बुधवारी चांदीच्या दरात वाढ झाली होती. परंतु आता पुन्हा एकदा चांदीच्याही दरात मोठी घसरण झाली आहे. चांदीची किंमत बुलियन मार्केटमध्ये ६७ हजारांच्याही खाली आली आहे.
डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण झाली असली तरी कॉमेक्स गोल्ड प्रायझेसमध्ये घसरण झाल्यानं दिल्लीत २४ कॅरेट सोनाच्या स्पॉट प्राईजमध्ये २१७ रूपयांची घसरण झाली आहेस अशी माहिती एचडीएफसी सिक्योरिटिजचे सीनिअर अॅनालिस्ट (कमोडिटी) तपन पटेल यांनी दिली.
४ मार्च रोजी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या दरात २१७ रूपयांची तर चांदीच्या दरात १२१७ रूपये प्रति किलोची घसरण झाली. यानंतर दिल्लीत सोन्याचे दर ६७,८१५ रूपयांवर आले. तर सोन्याचे दर हे ४४,३७२ रूपयांवर बंद झाले. एमसीएक्सवर एप्रिल महिन्यात देण्यात येणाऱ्या सोन्याचा वायदा दर ०.३१ टक्क्यांनी घसरून ४४,८१० रूपये झाला आहे. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात थोडी वाढ झालेली पाहायला मिळाली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर १७१७ डॉलर्स प्रति औस इतके झाले. तर आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या दरातही वाढ दिसून आली.
Gold Rates : सोनं ४५ हजारांच्या खाली, दरात पुन्हा घसरण; चांदीचे दरही गडगडले
Gold and Silver Price Today: पाहा काय आहे आजचा नवा दर, किती रूपयांनी घसरले सोन्या-चांदीचे दर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2021 18:38 IST2021-03-04T18:36:49+5:302021-03-04T18:38:54+5:30
Gold and Silver Price Today: पाहा काय आहे आजचा नवा दर, किती रूपयांनी घसरले सोन्या-चांदीचे दर

Gold Rates : सोनं ४५ हजारांच्या खाली, दरात पुन्हा घसरण; चांदीचे दरही गडगडले
Highlightsगेल्या अनेक दिवसांपासून सोन्याच्या दरात होत आहे घसरणआतापर्यंत सोन्याच्या दरात झाली ११ हजारांपेक्षा अधिक घसरण