LG Electronics IPO Listing: जरी टाटा कॅपिटलच्या IPO ची आज खराब सुरुवात झाली असली, तरी एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडियाचा IPO ग्रे मार्केटमध्ये मजबूत कामगिरी करत आहे. यामुळे धमाकेदार लिस्टिंगची अपेक्षा वाढली आहे. आज ग्रे मार्केटमध्ये IPO पहिल्यांदाच ४०० रुपयांच्या प्रीमियमच्या पार पोहोचला. ग्रे मार्केट संकेत देत आहे की एलजी इंडियाचा IPO १५५० रुपयांच्या पार लिस्ट होऊ शकतो.
काय आहे एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडियाचा जीएमपी?
इन्व्हेस्टर्स गेनच्या रिपोर्टनुसार, एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडियाचा IPO ग्रे मार्केटमध्ये सोमवारी ४१८ रुपयांच्या प्रीमियमवर ट्रेड करत आहे. रविवारच्या तुलनेत कंपनीच्या जीएमपीमध्ये ४८ रुपयांची वाढ झाली आहे, जी लिस्टिंगपूर्वी चांगली बाब आहे. आजच्या जीएमपीनुसार एलजी इंडियानं शेअर बाजारात एन्ट्री केल्यास, कंपनी पहिल्याच दिवशी ३६ टक्क्यांहून अधिक परतावा देऊ शकते.
दिवाळीत Kia च्या कार्सवर मिळतोय बंपर डिस्काऊंट, कंपनीनं आणल्या अनेक ऑफर्स; कोणत्या कारवर किती बचत?
१४ ऑक्टोबरला आहे लिस्टिंग
एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडियाच्या IPO ची लिस्टिंग १४ ऑक्टोबर रोजी प्रस्तावित आहे. म्हणजेच, उद्या कंपनी बीएसई (BSE) आणि एनएसई (NSE) मध्ये लिस्ट होईल. ३ दिवसांच्या ओपनिंग दरम्यान, या मेनबोर्ड सेगमेंटच्या IPO ला ५४.०२ पट सबस्क्राइब करण्यात आलं होतं. रिटेल कॅटेगरीमध्ये IPO ३.५५ पट, क्यूआयबी (QIB) मध्ये १६६.५१ पट आणि एनआयआय (NII) कॅटेगरीमध्ये २२.४४ पट सबस्क्राइब झाला होता. एलजी इंडियाचा IPO ७ ऑक्टोबर ते ९ ऑक्टोबरपर्यंत खुला होता.
कंपनीच्या IPO चा प्राइस बँड १०८० रुपये ते ११४० रुपये निश्चित करण्यात आला होता. कंपनीने १३ शेअर्सचा एक लॉट बनवला होता, ज्यामुळे गुंतवणूकदारांना कमीतकमी १४,८२० रुपयांची गुंतवणूक करावी लागली होती. एलजी इंडियाच्या IPO चा आकार ११,६०७.०१ कोटी रुपये होता. कंपनीच्या सध्याच्या गुंतवणूकदारांनी ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून शेअर्सची विक्री केली आहे.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)