नवी दिल्ली : नवीन पिढीच्या कंपन्यांकडून आयपीओसाठी रांग दिवसेंदिवस लांबत चालली आहे. २०२६ मध्ये अंदाजे ५०,००० कोटी किमतीचे स्टार्टअप आयपीओ येण्याची शक्यता आहे. २०२५ मध्ये ३६ हजार कोटींचे आयपीओ होते. असे असले तरी गुंतवणूकदार बाजारातील अस्थिरतेबद्दल चिंतित आणि सावध आहेत.
३६,६४० कोटी रुपये स्टार्टअप कंपन्यांनी २०२५ मध्ये आयपीओच्या माध्यमातून उभे केले. यात ओएफएस आणि एफपीओ यांचा समावेश आहे.
५० टक्के आयपीओंनी बंपर लिस्टिंगनंतर आतापर्यंत गुंतवणूकदारांचे नुकसान केले आहे.
२०२५ मधील स्टार्टअपचे रिपोर्ट कार्ड, लिस्टिंगनंतरची कामगिरी
अॅथर एनर्जी १३२%
ग्रो १८%
पाइन लॅब १४%
लेन्सकार्ट १०%
मीशो ०७%
या वर्षी येतील हे न्यू-एज आयपीओ
| कंपनीचे नाव | अपेक्षित आयपीओ आकार (₹ कोटीत) |
| फोनपे (PhonePe) | १३,५०० |
| झेप्टो (Zepto) | १२,००० |
| ओयो (OYO) | ६,६५० |
| इन्फ्रामार्केट (Infra.Market) | ५,००० |
| फॅक्टल (Fractal) | ४,९०० |
| शिपरॉकेट (Shiprocket) | २,३४२ |
| रॉडोफॅक्स / शॅडोफॅक्स (Shadowfax) | २,००० |
| बोट (boAt) | १,५०० |
| अमागी लॅब्स (Amagi Labs) | १,०२० |
| क्युअर फूड्स (Curefoods) | ८०० |
