Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले

शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले

Adani Ambani Networth:  रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर दोघांच्या नेटवर्थमध्ये बंपर वाढ झाली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 08:33 IST2026-04-09T08:29:46+5:302026-04-09T08:33:19+5:30

Adani Ambani Networth:  रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर दोघांच्या नेटवर्थमध्ये बंपर वाढ झाली.

gautam adani mukesh ambani benefit after us iran israel ceasefire Ranks rise in world richest list whos on top | शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले

शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले

Adani Ambani Networth:  रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर दोघांच्या नेटवर्थमध्ये बंपर वाढ झाली. 'ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्स'नुसार, एकाच दिवसात अदानी यांना ६.०६ अब्ज डॉलर्स (सुमारे ५६,००० कोटी रुपये) तर अंबानी यांच्या संपत्तीत ३.३७ अब्ज डॉलर्स (सुमारे ३१,३०० कोटी रुपये) वाढ झाली. या वाढीसह अदानी जगातील श्रीमंतांच्या यादीत २२ व्या स्थानावरून २१ व्या स्थानावर पोहोचले, तर अंबानी यांनी १८ व्या स्थानावर आपली पकड अधिक मजबूत केली आहे.

शेअर बाजारात तेजीचा तुफान परिणाम

शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर बुधवारी भारतीय शेअर बाजारात मोठी तेजी पाहायला मिळाली. याचा थेट सकारात्मक परिणाम अदानी समूह आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सवर झाला. रिलायन्सचा शेअर ३.३० टक्क्यांनी वधारून १,३४७.७५ रुपयांवर बंद झाला.

अदानी समूहाच्या शेअर्समध्येही मोठी उसळी दिसून आली. यात अदानी पोर्ट्स ५.२८ टक्के, अदानी ग्रीन ११.८५ टक्के, अदानी एंटरप्राइजेस ८.६५ टक्के, अदानी एनर्जी ९.१० टक्के आणि अदानी पॉवर ३.६६ टक्क्यांनी वधारले. समूहाचे इतर शेअर्सही वाढीसह बंद झाले, ज्याचा मोठा फायदा गौतम अदानी यांच्या एकूण संपत्तीत झाला.

जगातील इतर अब्जाधीशांच्या संपत्तीतही वाढ

इराण युद्धातील शस्त्रसंधीच्या घोषणेचा परिणाम वॉल स्ट्रीटवरही झाला आणि तिथेही बाजारात मोठी तेजी दिसून आली. या काळात सेन्सेक्स २,९४६ अंकांची भरारी घेत ७७,५६२ च्या पातळीवर बंद झाला. बुधवारी ज्या श्रीमंतांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली, त्यात मार्क झुकरबर्ग पहिल्या क्रमांकावर राहिले. त्यांच्या संपत्तीत १२.८ अब्ज डॉलर्सची वाढ होऊन त्यांचं एकूण नेटवर्थ २१७ अब्ज डॉलर्स झालं. बर्नार्ड अर्नाल्ट यांना ९.८९ अब्ज डॉलर्सचा फायदा झाला असून त्यांचं नेटवर्थ १६५ अब्ज डॉलर्स झालंय.

याशिवाय लॅरी पेज यांच्या संपत्तीत ८.८१ अब्ज डॉलर्सची वाढ होऊन ती २७० अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. सर्गेई ब्रिन यांना ८.१४ अब्ज डॉलर्सचा फायदा झाला आणि त्यांचं नेटवर्थ २५१ अब्ज डॉलर्स झालं. ओर्टेगा यांची संपत्ती ७.२२ अब्ज डॉलर्सने वाढून १२८ अब्ज डॉलर्सवर पोहोचली, तर जेफ बेझोस यांच्या नेटवर्थमध्ये ६.५७ अब्ज डॉलर्सची वाढ होऊन त्यांची एकूण संपत्ती २४३ अब्ज डॉलर्स झाली आहे.

सर्वात जास्त नुकसान 

या तेजीच्या वातावरणातही इलॉन मस्क यांना २.४४ अब्ज डॉलर्सचा फटका बसला. बुधवारी जगातील अब्जाधीशांच्या यादीत ते 'टॉप लूजर' ठरले. त्यांचं नेटवर्थ आता ६२३ अब्ज डॉलर्स इतकं राहिलं आहे.

Web Title : युद्धविराम से अडानी, अंबानी पर डॉलर की बारिश; रैंकिंग बढ़ी

Web Summary : युद्धविराम घोषणा के बाद अडानी और अंबानी की संपत्ति में उछाल आया, जिससे उनकी वैश्विक रैंकिंग में सुधार हुआ। अडानी को 6.06 बिलियन डॉलर और अंबानी को 3.37 बिलियन डॉलर का लाभ हुआ। शेयर बाजार की तेजी से उनकी कंपनियों को फायदा हुआ। अधिकांश अरबपतियों को फायदा हुआ, जबकि एलन मस्क को नुकसान हुआ।

Web Title : Truce showers dollars on Adani, Ambani; wealth rankings rise.

Web Summary : Adani and Ambani's wealth surged after the truce announcement, boosting their global rankings. Adani gained $6.06 billion, and Ambani added $3.37 billion. The stock market rally benefited their companies. While most billionaires gained, Elon Musk faced losses.