Lokmat Money > बिझनेस न्यूज > ५० देशांचे शेफ, १००० आलिशान कार, अनंत अंबानींपेक्षा अदानींच्या मुलाचे लग्न ठरणार महागडे?

५० देशांचे शेफ, १००० आलिशान कार, अनंत अंबानींपेक्षा अदानींच्या मुलाचे लग्न ठरणार महागडे?

jeet adani diva and jaimin shah : गौतम अदानी यांचा मुलगा जीत अदानी यांच्या लग्नाची तयारी जोरात सुरू आहे. रिपोर्ट्सनुसार, टेलर स्विफ्टसह जागतिक सेलिब्रिटी त्यांच्या लग्नाला उपस्थित राहू शकतात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 16:15 IST2025-01-21T16:14:35+5:302025-01-21T16:15:49+5:30

jeet adani diva and jaimin shah : गौतम अदानी यांचा मुलगा जीत अदानी यांच्या लग्नाची तयारी जोरात सुरू आहे. रिपोर्ट्सनुसार, टेलर स्विफ्टसह जागतिक सेलिब्रिटी त्यांच्या लग्नाला उपस्थित राहू शकतात.

gautam adani jeet adani diva jaimin shah wedding be more expensive than Anant Ambani | ५० देशांचे शेफ, १००० आलिशान कार, अनंत अंबानींपेक्षा अदानींच्या मुलाचे लग्न ठरणार महागडे?

५० देशांचे शेफ, १००० आलिशान कार, अनंत अंबानींपेक्षा अदानींच्या मुलाचे लग्न ठरणार महागडे?

jeet adani diva and jaimin shah : गेल्या वर्षी उद्योगपती मुकेश अंबानी यांचे कनिष्ठ चिरंजीव अनंत अंबानी यांच्या शाही विवाह सोहळ्याची जगभर चर्चा झाली. अनेक दिवस चाललेल्या अनंत यांच्या प्री-वेडिंग कार्यक्रमात जगभरातील अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते. या विवाह सोहळ्यात पाण्यासारखा पैसा खर्च करण्यात आला. या निमित्ताने मुकेश अंबानी यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. आता आणखी एक उद्योगपती आपल्या मुलाचं यापेक्षाही महागडं लग्न करण्याच्या बेतात आहे. गौतम अदानी यांचा मुलगा जीत अदानी याच्या लग्नाची चर्चा सुरू झाली आहे. त्याचे प्री-वेडिंग उदयपूरमध्ये झाले आहे. पण लग्न अजून झालेले नाही. रिपोर्टनुसार, जीत अदानी यांच्या लग्नालाही अनेक प्रसिद्ध चेहरे उपस्थित राहणार आहेत.

न्यूज १८ च्या रिपोर्टनुसार, गौतम अदानी यांच्या मुलाच्या लग्नासाठी ५० हून अधिक देशांतील शेफ आणि १००० हून अधिक आलिशान कार मागवण्यात येणार आहेत. यामध्ये बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत अनेक सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत. अदानी यांचा मुलगा जीत अदानी गुजरातचे हिरे व्यापारी जैमीन शाह यांची मुलगी दिवा जैमीन शाह हिच्याशी विवाहबद्ध होत आहे. गेल्या वर्षी १२ मार्च २०२३ रोजी दोघांचा साखरपुडा झाला आहे. त्यांनी आपलं नातं गोपनीय ठेवलं होतं. पण, त्यांच्या प्री-वेडिंग सेरेमनीनंतर अनंत अंबानींप्रमाणे त्यांच्या लग्नाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. प्रसिद्ध हॉलिवूड गायिका टेलर स्विफ्ट जीत यांच्या लग्नात परफॉर्म करणार असल्याची माहिती आहे.

हे गायक करणार सादरीकरण
अनंत अंबानींच्या लग्नापेक्षा जीत आणि दिवा शाह यांचा विवाहसोहळा अधिक प्रेक्षणीय ठरू शकतो, अशा बातम्या येत आहेत. देश-विदेशातील अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटी त्यांच्या लग्नाला हजेरी लावू शकतात. अहवालानुसार, संगीत क्षेत्रातील दिग्गज सेलिब्रिटी ट्रॅव्हिस स्कॉट आणि हनी सिंग परफॉर्मन्स करतील. तर जागतिक आयकॉन काइली जेनर, केंडल जेनर, सेलेना गोमेझ आणि सिडनी स्वीनी देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकतात.

गायिका टेलर स्विफ्ट येणार असल्याच्याही चर्चा आहेत. जीत आणि दिवा यांच्या लग्नसोहळ्याला ती हजेरी लावणार असल्याचं समजतंय. सध्या त्यांच्याकडून याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.

१००० हून अधिक लक्झरी कार
गौतम अदानी हे देशातील सर्वात मोठे उद्योगपती आहेत. त्यांच्या मुलाचे लग्न होणार आहे, त्यामुळे देशातील प्रसिद्ध व्यक्ती त्यात नक्कीच सहभागी होणार आहेत. याशिवाय परदेशातूनही पाहुणे येणार आहेत. १००० हून अधिक आलिशान आणि महागड्या वाहनांमध्ये लोक येणार आहेत. ५८ देशांतील प्रसिद्ध आणि उत्तम शेफनाही त्यांना सेवा देण्यासाठी आणि जेवणाची सुविधा देण्यासाठी बोलावण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
 

Web Title: gautam adani jeet adani diva jaimin shah wedding be more expensive than Anant Ambani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.