Lokmat Money > बिझनेस न्यूज > आपल्याच कंपनीत अधिकाऱ्यांपेक्षाही कमी सॅलरी घेतात गौतम अदानी, पाहा किती आहे त्यांचं वेतन?

आपल्याच कंपनीत अधिकाऱ्यांपेक्षाही कमी सॅलरी घेतात गौतम अदानी, पाहा किती आहे त्यांचं वेतन?

भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांच्या वेतनाबद्दल तुम्हाला माहितीये का? त्यांनी आपल्या कर्मचाऱ्याकडून कमी पगार घेतला असल्यची माहिती समोर आलीये.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 15:14 IST2025-06-09T15:13:55+5:302025-06-09T15:14:54+5:30

भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांच्या वेतनाबद्दल तुम्हाला माहितीये का? त्यांनी आपल्या कर्मचाऱ्याकडून कमी पगार घेतला असल्यची माहिती समोर आलीये.

gautam adani earns less than an officer in his own company see how much is his salary | आपल्याच कंपनीत अधिकाऱ्यांपेक्षाही कमी सॅलरी घेतात गौतम अदानी, पाहा किती आहे त्यांचं वेतन?

आपल्याच कंपनीत अधिकाऱ्यांपेक्षाही कमी सॅलरी घेतात गौतम अदानी, पाहा किती आहे त्यांचं वेतन?

भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांच्या वेतनाबद्दल तुम्हाला माहितीये का? त्यांनी आपल्या कर्मचाऱ्याकडून कमी पगार घेतला असल्यची माहिती समोर आलीये. गौतम अदानी यांना ३१ मार्च २०२५ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात एकूण १०.४१ कोटी रुपये पगार मिळाला होता. अदानी यांनी आपल्या अनेक कर्मचाऱ्यांपेक्षा कमी वेतन घेतलंय. अदानी यांचं मानधन त्यांच्या समूहातील कंपन्यांच्या किमान एक-दोन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपेक्षा कमी आहे. अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडचे सीईओ विनय प्रकाश यांना ६९.३४ कोटी रुपये वेतन मिळालं आहे. प्रकाश यांच्या मानधनात चार कोटी रुपये वेतन, ६५ कोटी ३४ लाख रुपये भत्ते तसंच अन्य सवलतींचा समावेश आहे. त्याचप्रमाणे अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचे (एजीईएल)व्यवस्थापकीय संचालक विनीत एस जैन यांना आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये ११.२३ कोटी रुपये, तर ग्रुप सीएफओ जुगेशिंदर सिंग यांना १०.४ कोटी रुपये वेतन मिळालं.

इतर उद्योगपतींच्या तुलनेत कमी पगार

गौतम अदानी यांनी केवळ आपल्या कर्मचाऱ्यांकडूनच नव्हे तर देशातील अनेक उद्योगपतींकडून अत्यंत कमी पगार घेतला. दूरसंचार उद्योगपती सुनील भारती मित्तल (२०२३-२४ मध्ये ३२.२७ कोटी रुपये), राजीव बजाज (२०२३-२४ मध्ये ५३.७५ कोटी रुपये), पवन मुंजाल (२०२३-२४ मध्ये १०९ कोटी रुपये), एल अँड टीचे अध्यक्ष एस. एन. सुब्रमण्यम (२०२४-२५ मध्ये ७६.२५ कोटी रुपये) आणि इन्फोसिसचे सीईओ सलील एस. पारेख (२०२४-२५ मध्ये ८०.६५ कोटी रुपये) यांच्यापेक्षा अदानी यांचे मानधन खूपच कमी आहे.

UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार

फक्त २ कंपन्यांकडून घेतला पगार

ही रक्कम उद्योगातील त्यांचे बहुतेक स्पर्धक आणि त्यांच्या स्वत: च्या प्रमुख अधिकाऱ्यांपेक्षा कमी आहे. समूहाच्या लिस्टेड कंपन्यांच्या ताज्या वार्षिक अहवालानुसार, ६२ वर्षीय अदानी यांना बंदरांपासून एनर्जीपर्यंत पसरलेल्या त्यांच्या व्यवसाय समूहातील नऊ लिस्टेड कंपन्यांपैकी केवळ दोन कंपन्यांकडून पगार मिळाला. त्यांचं एकूण मानधन २०२३-२४ मधील ९.२६ कोटी रुपयांच्या तुलनेत २०२४-२५ मध्ये १२ टक्क्यांनी अधिक होतं. समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड (एईएल) कडून २०२४-२५ साठी त्यांच्या मानधनात २.२६ कोटी रुपये वेतन आणि २८ लाख रुपये भत्ते, सुविधा आणि इतर लाभांचा समावेश आहे.

याशिवाय अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोनकडून (एपीएसईझेड) त्यांना ७.८७ कोटी रुपये मिळाले. यात १.८ कोटी रुपये वेतन आणि ६.०७ कोटी रुपये कमिशनचा समावेश आहे. अदानींचा पगार भारतातील जवळजवळ सर्व मोठ्या कौटुंबिक मालकीच्या समूहांच्या प्रमुखांपेक्षा कमी आहे. मात्र, सर्वात श्रीमंत भारतीय मुकेश अंबानी कोविड-१९ महासाथीपासून पगार घेत नाहीत.

Web Title: gautam adani earns less than an officer in his own company see how much is his salary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.