Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > ७६८ पट सबस्क्राईब झालेला 'हा' IPO; पण बाजारात एन्ट्री घेताच लोअर सर्किट, ₹८४ वर आला शेअर

७६८ पट सबस्क्राईब झालेला 'हा' IPO; पण बाजारात एन्ट्री घेताच लोअर सर्किट, ₹८४ वर आला शेअर

Gabion Technologies India IPO: या कंपनीच्या शेअरनं आज बाजारात निराशाजनक एन्ट्री घेतली. या कंपनीच्या इश्यूला गुंतवणूकदारांकडून इतका जोरदार प्रतिसाद मिळाला की, बोलीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच ८ जानेवारी रोजी हा IPO एकूण ७६८.१३ पट सबस्क्राइब झाला होता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 11:59 IST2026-01-13T11:58:20+5:302026-01-13T11:59:23+5:30

Gabion Technologies India IPO: या कंपनीच्या शेअरनं आज बाजारात निराशाजनक एन्ट्री घेतली. या कंपनीच्या इश्यूला गुंतवणूकदारांकडून इतका जोरदार प्रतिसाद मिळाला की, बोलीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच ८ जानेवारी रोजी हा IPO एकूण ७६८.१३ पट सबस्क्राइब झाला होता.

Gabion Technologies India IPO subscribed 768 times But as soon as it entered the market the share went down to rs 84 | ७६८ पट सबस्क्राईब झालेला 'हा' IPO; पण बाजारात एन्ट्री घेताच लोअर सर्किट, ₹८४ वर आला शेअर

७६८ पट सबस्क्राईब झालेला 'हा' IPO; पण बाजारात एन्ट्री घेताच लोअर सर्किट, ₹८४ वर आला शेअर

Gabion Technologies India IPO: गॅबियन टेक्नॉलॉजीज इंडियाच्या IPO नं शेअर बाजारात एन्ट्री घेतली. नवी दिल्ली स्थित या कंपनीच्या इश्यूला गुंतवणूकदारांकडून इतका जोरदार प्रतिसाद मिळाला की, बोलीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच ८ जानेवारी रोजी हा IPO एकूण ७६८.१३ पट सबस्क्राइब झाला होता. एखाद्या SME IPO ला इतकी मोठी मागणी मिळणं बाजारात क्वचितच पाहायला मिळते.

तीन दिवसांच्या कालावधीत (६ ते ८ जानेवारी) गुंतवणूकदारांनी कंपनीच्या २५.७७ लाख शेअर्सच्या तुलनेत सुमारे १९७.९९ कोटी शेअर्ससाठी बोली लावली, ज्याचं एकूण मूल्य सुमारे १६,०३७ कोटी रुपये होतं. मात्र, या मागणीच्या तुलनेत लिस्टिंगनं बरीच निराशा केली. बीएसईवर कंपनीचे शेअर्स १० टक्के प्रीमियमसह ८९ रुपयांवर लिस्ट झाले. याची प्राईस बँड ८१ रुपये होती. लिस्टिंगनंतर यात ५ टक्क्यांचं लोअर सर्किट देखील लागलं आणि हा शेअर ८४.५५ रुपयांवर आला.

अमेरिकेचा इराणसोबत व्यापार करणाऱ्या देशांना इशारा, २५ टक्के अतिरिक्त टॅरिफची घोषणा; भारतावर होणार 'हा' परिणाम

कोणत्या श्रेणीतून किती सबस्क्रिप्शन मिळालं?

सबस्क्रिप्शनची आकडेवारी प्रत्येक श्रेणीमध्ये धक्कादायक राहिली. नॉन-इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स (NII) चा हिस्सा सर्वाधिक १,०८५.८८ पट भरला, तर किरकोळ (रिटेल) गुंतवणूकदारांनी देखील हा ८६७.२३ पट सबस्क्राइब केला. त्याचबरोबर, क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल बायर्सचा (QIBs) कोटा २७१.१३ पट भरला. या प्रचंड मागणीचा परिणाम ग्रे मार्केटमध्येही दिसून आला, जिथे IPO चा ग्रे मार्केट प्रीमियम (GMP) सुमारे ४०% पर्यंत पोहोचला होता, जो आधी ३७% च्या आसपास होता. यामुळे गुंतवणूकदारांना लिस्टिंग गेनची अधिक अपेक्षा दिसत होती.

गॅबियन टेक्नॉलॉजीजने या IPO च्या माध्यमातून २९.१६ कोटी रुपये उभारण्याचे उद्दिष्ट ठेवलं होतं. याअंतर्गत कंपनीनं ७६-८१ रुपये प्रति शेअर या प्राईस बँडवर एकूण ३६ लाख शेअर्स जारी केले. IPO मधून मिळणाऱ्या रकमेचा वापर प्रामुख्यानं खेळत्या भांडवलाची गरज (Working Capital), प्लांट आणि मशिनरीची खरेदी आणि उर्वरित पैशांचा वापर सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी केला जाईल. IPO चे वाटप ९ जानेवारी रोजी अंतिम होणं अपेक्षित आहे, तर कंपनीचे शेअर्स १३ जानेवारीपासून BSE SME प्लॅटफॉर्मवर ट्रेडिंगसाठी उपलब्ध होतील.

कंपनीचा व्यवसाय

कंपनीच्या व्यवसायाबद्दल बोलायचं झालं तर, गॅबियन टेक्नॉलॉजीज स्टील वायर मेश गॅबियन्स, रॉकफॉल प्रोटेक्शन नेटिंग आणि जिओसिंथेटिक मटेरिअल्स तयार करते. याचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट हिमाचल प्रदेशातील पांवटा साहिब येथे आहे. कंपनीनं आतापर्यंत ७६ प्रकल्प स्वतंत्रपणे पूर्ण केले आहेत, ज्यांचं एकूण मूल्य १२७.६ कोटी रुपये राहिलं आहे. रस्ते, रेल्वे, ऊर्जा, खाणकाम, संरक्षण आणि विमानतळ यांसारख्या क्षेत्रांत कंपनीची उपस्थिती आहे. सध्या कंपनीची ऑर्डर बुक १७२.४७ कोटी रुपयांची आहे, जी तिच्या भविष्यातील व्यवसायाबाबत गुंतवणूकदारांचा विश्वास मजबूत करते. या IPO मध्ये जीवायआर कॅपिटल ॲडव्हायझर्सने बुक रनिंग लीड मॅनेजरची भूमिका बजावली.

(टीप- यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title : 768 गुना सब्सक्राइब हुआ IPO, एंट्री पर लगा लोअर सर्किट

Web Summary : गैबियन टेक्नोलॉजीज का IPO 768 गुना सब्सक्राइब होने के बावजूद निराशाजनक रहा। मजबूत मांग के बाद भी, शेयर ₹89 पर लिस्ट हुआ और फिर लोअर सर्किट लगने से ₹84.55 पर आ गया। IPO का लक्ष्य ₹29.16 करोड़ जुटाना था।

Web Title : Oversubscribed IPO hits lower circuit after market entry.

Web Summary : Gabion Technologies' IPO, oversubscribed 768 times, debuted disappointingly. Despite strong investor interest, the stock listed at ₹89, then fell to ₹84.55 after hitting a lower circuit. The IPO aimed to raise ₹29.16 crore for working capital and expansion.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.