Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > युद्धाचा इंधन बाजारावर गंभीर परिणाम; ८० हून अधिक देशांत पेट्रोल दरवाढ, भारतात मात्र दर स्थिर

युद्धाचा इंधन बाजारावर गंभीर परिणाम; ८० हून अधिक देशांत पेट्रोल दरवाढ, भारतात मात्र दर स्थिर

Fuel Price Updates: २८ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या संघर्षानंतर ८० पेक्षा अधिक देशांनी पेट्रोलच्या किमती वाढवल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 14:11 IST2026-03-12T14:09:06+5:302026-03-12T14:11:37+5:30

Fuel Price Updates: २८ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या संघर्षानंतर ८० पेक्षा अधिक देशांनी पेट्रोलच्या किमती वाढवल्या आहेत.

Fuel Price Updates: Conflict in the Middle East has an impact on the fuel market; Petrol prices have increased in more than 80 countries, but prices remain stable in India | युद्धाचा इंधन बाजारावर गंभीर परिणाम; ८० हून अधिक देशांत पेट्रोल दरवाढ, भारतात मात्र दर स्थिर

युद्धाचा इंधन बाजारावर गंभीर परिणाम; ८० हून अधिक देशांत पेट्रोल दरवाढ, भारतात मात्र दर स्थिर

Fuel Price : इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यातील संघर्षाचा परिणाम जगभरातील इंधन बाजारावर होत असून, अनेक देशांमध्ये पेट्रोलच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. २८ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या संघर्षानंतर ८० पेक्षा अधिक देशांनी पेट्रोलच्या किमती वाढवल्या आहेत. मात्र, अशा कठीण परिस्थितीतही भारतात पेट्रोलच्या दरात अद्याप कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.

जगभरात इंधन दरवाढ

आंतरराष्ट्रीय उर्जा बाजारावर युद्धाचा परिणाम दिसू लागला आहे. पेट्रोलियम पुरवठ्यावर ताण आल्याने अनेक देशांमध्ये इंधनाच्या किमती झपाट्याने वाढल्या आहेत. जागतिक स्तरावर इंधन दरांचे निरीक्षण करणाऱ्या ग्लोबल पेट्रोल प्राईस डॉट कॉमच्या डेटानुसार, २८ फेब्रुवारीला इराणवर अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यांनंतर किमान ८५ देशांनी पेट्रोलच्या किमती वाढवल्या आहेत. काही देशांमध्ये इंधन दर महिन्याच्या शेवटीच बदलले जातात. त्यामुळे एप्रिल महिन्यात आणखी अनेक देशांमध्ये दरवाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अमेरिकेत पेट्रोल $४ प्रति गॅलन पार

अमेरिकेत पेट्रोलचे दर राज्यनिहाय ठरवले जातात. अमेरिकन ऑटोमोबाईल असोसिएशनच्या फ्यूल प्राइस ट्रॅकरनुसार, फेब्रुवारीमध्ये अमेरिकेत एका गॅलन रेग्युलर पेट्रोलची सरासरी किंमत $२.९४ होती. ती आता वाढून $३.५८ प्रति गॅलन झाली आहे. अनेक राज्यांमध्ये पेट्रोलचा दर $४ प्रति गॅलन पेक्षा जास्त झाला आहे. तर कॅलिफोर्नियामध्ये पेट्रोलची किंमत $५ प्रति गॅलन पेक्षा जास्त झाली असून, गेल्या दोन वर्षांतील ही सर्वाधिक पातळी मानली जात आहे.

व्हिएतनाममध्ये सर्वाधिक दरवाढ

इंधन दरवाढीचा सर्वाधिक फटका व्हिएतनामला ला बसला आहे. २३ फेब्रुवारीला ९५ ऑक्टेन पेट्रोलची किंमत $0.75 प्रति लिटर होती, जी ९ मार्चपर्यंत वाढून $1.13 प्रति लिटर झाली. म्हणजे जवळपास ५० टक्क्यांची वाढ झाली.

होर्मुझ सामुद्रधुनीवर अवलंबित्व

आशियातील अनेक देश तेल आणि गॅस पुरवठ्यासाठी होर्मुझ या महत्त्वाच्या समुद्री मार्गावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत. युद्धानंतर या मार्गावरील पुरवठा अडथळ्यांमुळे अनेक देशांनी खबरदारीचे उपाय सुरू केले आहेत. ८ मार्च रोजी जपानने आपल्या रणनीतिक तेल साठ्यांचा वापर करण्यासाठी तयारी ठेवण्याचे निर्देश दिले. तर, दक्षिण कोरियाने तब्बल ३० वर्षांनंतर प्रथमच पेट्रोल आणि डिझेलवर कमाल किंमत मर्यादा लागू केली.

चीन आणि कॅनडामध्येही दरवाढ

चीनमध्येही २३ फेब्रुवारीला ९५ ऑक्टेन पेट्रोलची किंमत $1.08 प्रति लिटर होती. ती ९ मार्चपर्यंत वाढून $1.19 प्रति लिटर झाली. तसेच कॅनडामध्ये २३ फेब्रुवारीला पेट्रोलची किंमत $1.16 प्रति लिटर होती, जी ९ मार्चला वाढून $1.30 प्रति लिटर झाली. म्हणजे सुमारे ११.६४ टक्के वाढ झाली आहे.

भारतात दर स्थिर

जागतिक बाजारात इंधन दरवाढ होत असताना भारतात पेट्रोलच्या किमती अद्याप स्थिर आहेत. उर्जा तज्ञांच्या मते, देशाकडे असलेले पुरेसे साठे आणि सरकारी नियंत्रणामुळे सध्या ग्राहकांवर दरवाढीचा थेट परिणाम झालेला नाही. 

Web Title : युद्ध से वैश्विक स्तर पर पेट्रोल की कीमतें बढ़ीं; भारत में स्थिर

Web Summary : युद्ध के कारण वैश्विक ईंधन की कीमतें बढ़ीं, 80 से अधिक देश प्रभावित। दुनिया भर में पेट्रोल की कीमतें बढ़ने के बावजूद, भारत ने भंडार और सरकारी नियंत्रण से स्थिर दरें बनाए रखीं।

Web Title : War Fuels Global Petrol Price Hike; India Remains Stable

Web Summary : Global fuel prices surge due to conflict, impacting over 80 countries. While nations worldwide experience petrol price hikes, India maintains stable rates, benefiting from reserves and government control.