Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > EPFO धारकांना केव्हापासून UPI द्वारे पैसे काढता येणार? झालं कन्फर्म, कशी मिळणार ही सुविधा

EPFO धारकांना केव्हापासून UPI द्वारे पैसे काढता येणार? झालं कन्फर्म, कशी मिळणार ही सुविधा

EPFO UPI Payment: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे (EPFO) सदस्य आता त्यांच्या ईपीएफ खात्यातून थेट UPI द्वारे बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकणार आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 09:18 IST2026-01-17T09:18:40+5:302026-01-17T09:18:40+5:30

EPFO UPI Payment: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे (EPFO) सदस्य आता त्यांच्या ईपीएफ खात्यातून थेट UPI द्वारे बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकणार आहेत.

From when will EPFO holders be able to withdraw money through UPI Confirmed how to get this facility | EPFO धारकांना केव्हापासून UPI द्वारे पैसे काढता येणार? झालं कन्फर्म, कशी मिळणार ही सुविधा

EPFO धारकांना केव्हापासून UPI द्वारे पैसे काढता येणार? झालं कन्फर्म, कशी मिळणार ही सुविधा

EPFO UPI Payment: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे (EPFO) सदस्य आता त्यांच्या ईपीएफ खात्यातून थेट UPI द्वारे बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकणार आहेत. कामगार मंत्रालयातील एका उच्च पदस्थ सूत्रानं दिलेल्या माहितीनुसार, ही नवीन सुविधा यावर्षी एप्रिल २०२६ पासून सुरू होईल. EPFO ला बँकेसारख्या सुविधा देणं आणि सदस्यांना अधिक लवचिकता, जलद पैसे काढण्याची सुविधा व सुलभ प्रक्रिया उपलब्ध करून देण्याच्या दिशेनं हे एक महत्त्वाचं पाऊल आहे. 

सदस्यांनी त्यांचा UAN अपडेट ठेवावा आणि अधिकृत EPFO पोर्टल किंवा ॲपवर लक्ष ठेवावं, असा सल्ला देण्यात आला आहे. कामगार मंत्रालय अशा एका प्रकल्पावर काम करत आहे ज्यामध्ये EPF चा एक ठराविक हिस्सा 'फ्रीज' केला जाईल आणि मोठा हिस्सा UPI चा वापर करून बँक खात्यातून काढण्यासाठी उपलब्ध असेल.

नवीन प्रणाली कशी काम करणार?

कामगार मंत्रालय एका मोठ्या प्रकल्पावर काम करत आहे, ज्यामध्ये:

  • EPF शिलकीचा एक हिस्सा (किमान २५%) फ्रीज (लॉक) राहील, जेणेकरून निवृत्तीसाठी पुरेशी रक्कम शिल्लक राहील.
  • उर्वरित मोठा हिस्सा (सुमारे ७५% पर्यंत) सदस्य थेट त्यांच्या बँक खात्यात UPI द्वारे काढू शकतील.
  • सदस्य UPI ॲप्स किंवा ATM द्वारे पात्र शिल्लक रक्कम पाहू शकतील आणि UPI पिन टाकून सुरक्षितपणे पैसे ट्रान्सफर करू शकतील.
  • पैसे ट्रान्सफर झाल्यानंतर ते बँक खात्यात जमा होतील, जे UPI पेमेंट, ATM मधून पैसे काढणं किंवा इतर पद्धतींनं  वापरता येतील.

सॉफ्टवेअर अपडेट आणि मुख्य फायदे

EPFO आपल्या सॉफ्टवेअरमध्ये अपडेट करत आहे जेणेकरून ही यंत्रणा कोणत्याही त्रुटीशिवाय सुरळीत चालेल. या सुविधेचा फायदा सुमारे ८ कोटी EPFO सदस्यांना होणार आहे. सध्या EPF काढण्यासाठी फॉर्म भरावा लागतो आणि वाट पाहावी लागते, ज्यामध्ये खूप वेळ जातो. नवीन ऑटो-सेटलमेंट व्यवस्थेअंतर्गत, क्लेम इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं ३ दिवसांत निकाली काढले जातील. ऑटो-सेटलमेंटची मर्यादा पूर्वी १ लाख रुपये होती, जी आता वाढवून ५ लाख रुपये करण्यात आली आहे.

नवीन प्रणाली का आवश्यक आहे?

आजारपण, शिक्षण, लग्न, घर बांधणं यांसारख्या तातडीच्या खर्चासाठी यामुळे त्वरित निधी उपलब्ध होईल. COVID-19 दरम्यान EPFO ने ऑनलाइन ऑटो-सेटलमेंट सुरू केलं होतं, ज्यामुळे गरजूंना जलद मदत मिळाली. दरवर्षी ५ कोटींहून अधिक क्लेम्स निकाली काढले जातात, नवीन प्रणालीमुळे EPFO चा वेळ आणि कामाचा ताण लक्षणीयरीत्या कमी होईल.

EPF काढण्याचे नवीन नियम

पात्र EPF शिलकीच्या १००% (कर्मचारी + नियोक्ता हिस्सा) रक्कम काढण्यासाठी उपलब्ध असेल, परंतु किमान २५% शिल्लक नेहमी खात्यात ठेवली जाईल. EPFO चा सध्याचा व्याजदर वार्षिक ८.२५% आहे, जो चक्रवाढ पद्धतीनं निवृत्तीचा निधी वाढवण्यास मदत करतो. पूर्वीचे १३ जटिल नियम सोपे करून आता फक्त ३ प्रमुख श्रेणींमध्ये बदलले आहेत: १. अत्यावश्यक गरजा (आजारपण, शिक्षण, लग्न) २. घराशी संबंधित गरजा ३. विशेष परिस्थिती यामुळे १००% ऑटो-सेटलमेंट शक्य होईल आणि बहुतेक प्रकरणांमध्ये कोणत्याही कागदपत्रांची गरज भासणार नाही.

Web Title : EPFO यूपीआई से निकासी की अनुमति देगा: विवरण, लाभ और नए नियम

Web Summary : ईपीएफओ अप्रैल 2026 से यूपीआई के माध्यम से निकासी की अनुमति देगा, जिससे धन की त्वरित पहुंच मिलेगी। सदस्य यूपीआई के माध्यम से अपने ईपीएफ बैलेंस का 75% तक निकाल सकते हैं, यह सुनिश्चित करते हुए कि 25% सेवानिवृत्ति के लिए रहे। ऑटो-सेटलमेंट की सीमा बढ़ाकर ₹5 लाख कर दी गई है, जिससे दावा प्रसंस्करण 3 दिनों तक सुव्यवस्थित हो गया है।

Web Title : EPFO to Allow UPI Withdrawals: Details, Benefits, and New Rules

Web Summary : EPFO will allow UPI withdrawals from April 2026, offering quicker access to funds. Members can withdraw up to 75% of their EPF balance via UPI, ensuring 25% remains for retirement. The auto-settlement limit has increased to ₹5 lakh, streamlining claim processing to 3 days.