देशातील डिजिटल व्यवहार प्रणालीत मोठा बदल करण्याचा निर्णय एनपीसीआयने घेतला असून त्यानुसार, ८ ऑक्टोबरपासून यूपीआयद्वारे होणाऱ्या पेमेंटच्या ओळख पडताळणीसाठी चेहरा आणि बोटांचे ठसे यांचा वापर करण्यास परवानगी देण्यात आली आहे. गैरव्यवहार व फसवणुकीच्या घटनांना आळा घालण्यासाठी या दोन नवीन पद्धती सुरू करण्यात येणार असल्याचं उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितलं.
आतापर्यंत यूपीआय पेमेंटसाठी संख्यात्मक पिन टाकणं बंधनकारक होतं; पण आता ‘आरबीआय’च्या नव्या नियमांनुसार इतर ओळख पद्धतींनाही परवानगी दिली गेली आहे.
युको बँकेत ₹१,००,००० जमा करा आणि मिळवा ₹२१,८७९ चं निश्चित व्याज
फसवणुकीचं प्रमाण घटलं
मागील वर्षाच्या तुलनेत यूपीआय व्यवहारांमध्ये ३१ टक्के वाढ, तर एकूण रकमेत ३४% वाढ झाली आहे. मात्र, आयएमपीएस व आधार-आधारित पेमेंट (एईपीएस) प्रणालींमधील व्यवहारांत घट नोंदली गेली आहे. बायोमेट्रिक डेटाद्वारे डिजिटल व्यवहारांना परवानगी मिळाली आहे.
आता ग्राहक अंगठ्याचा ठसा, चेहरा ओळख वापरून पेमेंट करू शकतील. ज्या देशांत ही सुविधा सुरू झाली आहे, तेथे फसवणुकीचे प्रमाण जवळपास ५०% नं कमी झाल्याची माहिती समोर आली आहे.