Lokmat Money > बिझनेस न्यूज > Jio, Airtel आणि Vi च्या प्लान्ससोबत झाला फ्री Netflix चा जुगाड, किंमत फारच कमी

Jio, Airtel आणि Vi च्या प्लान्ससोबत झाला फ्री Netflix चा जुगाड, किंमत फारच कमी

Jio Airtel And Vi Free Netflix Plan: आज आपण जिओ, एअरटेल आणि व्हीआय या कंपन्यांच्या अशा प्लान्सबद्दल जाणून घेऊन ज्यांच्यासोबत नेटफ्लिक्सचं फ्री सब्सक्रिप्शन मिळत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 15:49 IST2025-04-12T15:48:38+5:302025-04-12T15:49:21+5:30

Jio Airtel And Vi Free Netflix Plan: आज आपण जिओ, एअरटेल आणि व्हीआय या कंपन्यांच्या अशा प्लान्सबद्दल जाणून घेऊन ज्यांच्यासोबत नेटफ्लिक्सचं फ्री सब्सक्रिप्शन मिळत आहे.

Free Netflix deal with Jio Airtel and Vi plans price is very low know before recharging | Jio, Airtel आणि Vi च्या प्लान्ससोबत झाला फ्री Netflix चा जुगाड, किंमत फारच कमी

Jio, Airtel आणि Vi च्या प्लान्ससोबत झाला फ्री Netflix चा जुगाड, किंमत फारच कमी

Jio Airtel And Vi Free Netflix Plan: जिओ, एअरटेल आणि व्हीआय या तिन्ही टेलिकॉम कंपन्या आपल्या युजर्ससाठी नवनवीन प्लान आणत असतात. आज आपण या कंपन्यांच्या अशा प्लान्सबद्दल जाणून घेऊन ज्यांच्यासोबत नेटफ्लिक्सचं फ्री सब्सक्रिप्शन मिळत आहे.

जिओच्या नेटफ्लिक्स फ्री रिचार्ज प्लानबद्दल बोलायचं झालं तर त्याची किंमत १२९९ रुपये आहे. ज्यामध्ये युजर्सला दररोज २ जीबी डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि मोबाइल किंवा टॅबवर नेटफ्लिक्स स्ट्रिमिंग असे लाभ मिळतील. या पॅकची वैधता ८४ दिवसांची असून याव्यतिरिक्त यात युजर्सना ९० दिवसांसाठी जिओ हॉटस्टारचं सबस्क्रिप्शनही मिळेल. याशिवाय १७९९ रुपयांच्या प्लानमध्येही ३ जीबी डेटासह नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन देण्यात येतं.

एअरटेलचा नेटफ्लिक्स फ्री रिचार्ज प्लान

एअरटेलच्या मोफत नेटफ्लिक्स रिचार्ज प्लानची किंमत १७९८ रुपये आहे, हा एक प्रीपेड प्लॅन आहे. ज्यात युजर्सना दररोज ३ जीबी डेटा आणि १०० एसएमएस मिळतात. याशिवाय कंपनी या प्लानच्या रिचार्जवर युजर्संना अनलिमिटेड ५जी डेटा देखील देत आहे. याशिवाय कंपनी नेटफ्लिक्सचे बेसिक सब्सक्रिप्शन, एक्सट्रीम अॅपचा अॅक्सेस, स्पॅम कॉल आणि एसएमएस अलर्ट, अपोलो २४/७ सर्कल आणि फ्री हॅलोट्यून्स सारखे फायदे देत आहे.

व्हीआयचा १५९९ रुपयांचा प्रीपेड प्लान

या प्लानची वैधता ८४ दिवसांची आहे. या प्लानमध्ये कंपनी युजर्संना अनलिमिटेड कॉलसह दररोज २.५ जीबी डेटा देत आहे. याशिवाय युजर्संना डेली १०० एसएमएसची सेवा मिळते. या प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड ५जी डेटा (फक्त मुंबईत वापरण्यासाठी), नेटफ्लिक्स (टीव्ही + मोबाइल) सब्सक्रिप्शन मिळतं.

११९८ रुपयांचा प्रीपेड प्लान

या प्लॅनची वैधता ७० दिवसांची आहे. या प्लानमध्ये युजर्संना अनलिमिटेड कॉलिंगसोबत दररोज २ जीबी डेटा आणि डेली १०० एसएमएस मिळतात. या प्लानमध्ये युजर्संना अनलिमिटेड ५जी डेटा (फक्त मुंबईत वापरण्यासाठी), नेटफ्लिक्स (टीव्ही + मोबाइल) सब्सक्रिप्शन आणि इतर फायदे मिळतात.

Web Title: Free Netflix deal with Jio Airtel and Vi plans price is very low know before recharging

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.