Messi India Tour: फुटबॉलचा महान खेळाडू लिओनेल मेस्सी याचा १४ वर्षांनंतरचा भारत दौरा सध्या चर्चेत आहे. तो १३ डिसेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत भारतात राहणार असून, अनेक कार्यक्रमांमध्ये भाग घेणार आहे. या भारत भेटीदरम्यान तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार आहे.
मेस्सीचा हा भारत दौरा कोलकातामधील लोकांसाठी खूप खास आहे, कारण त्यानं २०११ मध्ये याच सॉल्ट लेक स्टेडियममध्ये अर्जेंटिनाचा कर्णधार म्हणून खेळला होता. मेस्सी १३ डिसेंबर रोजी 'सिटी ऑफ जॉय' म्हणजेच कोलकाता येथे पोहोचेल. येथूनच त्याच्या चार शहरांच्या 'GOAT इंडिया टूर २०२५' ची सुरुवात होईल. आज आपण मेस्सीच्या संपत्तीबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करू.
पुढील ३ वर्षांत २ IPO आणण्याची रिलायन्सची तयारी; पाहा काय आहे मुकेश अंबानींचा प्लॅन
अनेक दिवसांचं आयोजन
मेसी तीन दिवस कोलकाता, हैदराबाद, मुंबई आणि नवी दिल्ली या चार शहरांमध्ये घालवणार आहे. या काळात फुटबॉलचा थरार, सांस्कृतिक उत्सव, संगीत कार्यक्रम, फुटबॉल क्लिनिक आणि मोठे फॅन इव्हेंट्स आयोजित केले जाणार आहेत.
किती आहे नेटवर्थ?
३८ वर्षीय लिओनेल मेस्सीनं केवळ फुटबॉलच्या इतिहासातच आपलं नाव कोरत नाहीये, तर तो एक मोठे ग्लोबल बिझनेस साम्राज्यही उभारत आहे. त्याची अंदाजित नेटवर्थ ८५० मिलियन डॉलर (सुमारे ७,७०० कोटी रुपये) आहे. त्याची कमाई अनेक स्त्रोतांकडून होतं, ज्यात फुटबॉल मॅचची फी आणि स्पॉन्सरशिप्स यांचा समावेश आहे.
जाहिरातीतून किती कमाई?
मेस्सी अनेक कंपन्यांशी जोडलेला आहे. जाहिरातींच्या माध्यमातून तो दरवर्षी सुमारे ७० मिलियन डॉलरची कमाई करतो. त्याने अडिडाससोबत लाईफटाइम करार केला आहे, ज्याची किंमत एक अब्ज डॉलरपेक्षा जास्त आहे. याव्यतिरिक्त, अॅपल, पेप्सी, मास्टरकार्ड, कोनामी यांसारख्या कंपन्यांसह तो जोडला गेला आहे.
रिअल इस्टेटमध्ये मोठी गुंतवणूक
मेसीने रिअल इस्टेटमध्येही गुंतवणूक केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मेस्सीनं रिअल इस्टेटमध्ये ५० ते ६० मिलियन डॉलरची गुंतवणूक केली आहे. यात बार्सिलोना, मियामी, एंडोरा आणि लंडन येथील आलिशान घरांचा समावेश आहे. याशिवाय, त्याचा स्वतःचा कपड्यांचा ब्रँड आहे आणि मेस्सी स्टोअर्स आहेत. हा व्यवसाय १५० ते २०० मिलियन डॉलरचा आहे. स्पेनजवळील इबिझा आयलँडवर मेस्सीचं सर्वात महागडं आणि आलिशान घर आहे, ज्याची किंमत अंदाजे १०० कोटी रुपये आहे.
१०० कोटी रुपयांचे प्रायव्हेट जेट
मेस्सीकडे स्वतःचं प्रायव्हेट जेट देखील आहे. याची किंमत सुमारे १०० कोटी रुपये आहे. यात १५ हून अधिक लोक प्रवास करू शकतात. तो कुटुंबासोबत या प्रायव्हेट जेटमधून प्रवास करतो. याशिवाय, मेस्सीचे अनेक मोठे आणि भव्य हॉटेल्स आहेत. त्याचं ७७ बेडरूम असलेलं हॉटेल खूप प्रसिद्ध आहे. त्याच्याकडे अनेक मोठ्या कंपन्यांच्या महागड्या कार्स देखील आहेत, ज्यात ऑडी, रेंज रोव्हर, फरारी, मर्सिडीज इत्यादींचा समावेश आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार त्याची नेटवर्थ अंदाजे ७७०० कोटी रुपये आहे.
