financial planning tips : आजकाल मुलांचे पालनपोषण करण्यात सर्वाधिक खर्च त्यांच्या शिक्षणावर होत आहे. म्हणजे तुमच्या पहिली ते पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी जितके पैसे लागले असतील तेवढे पैसे तर प्री-स्कूलच्या पहिल्या वर्षालाच लागत आहेत. अशा परिस्थितीत मुलांना उच्च शिक्षित करण्यासाठी आतापासून आर्थिक नियोजन करणे आवश्यक आहे. जेणेकरुन त्यांच्या शिक्षणात कोणताही खंड पडू नये. भविष्यात तुमच्या लहान मुलांच्या उच्च शिक्षणासाठी तुम्ही आत्ताच आर्थिक नियोजन सुरू केले पाहिजे. जर तुम्हाला किंवा तुमच्या मुलाला तुम्ही परदेशात शिक्षण घ्यायचे असेल, तर काही गोष्टी समजून घेणे महत्त्वाचे आहे. आज आम्ही तुम्हाला अशा आर्थिक टिप्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांचा अवलंब करून तुम्ही तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिकदृष्ट्या तयार होऊ शकता.
उच्च शिक्षणासाठी आर्थिक गणित करा
सर्वप्रथम, तुमच्या मुलाच्या उच्च शिक्षणासाठी भविष्यात किती खर्च येऊ शकतो याचा अंदाज घ्या. यामध्ये, तुम्ही शिकवणी शुल्काचा अंदाज लावा. परदेशातील खाजगी महाविद्यालयांचे शुल्क दरवर्षी लाखो रुपयांपर्यंत असते. याशिवाय, प्रवासाचा खर्च आणि घरापासून दूर राहण्याचा खर्च त्यात जोडा.
गुंतवणुकीला लवकर सुरुवात
आर्थिक नियोजनची पहिली पायरी म्हणजे लवकर गुंतवणुकीला सुरुवात करणे होय. गुंतवणूक करून तुम्ही केवळ पैसे जमा करत नाही तर तुमचे भविष्य देखील सुरक्षित करता. तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी तुमचे पैसे चांगल्या योजनेत गुंतवा.
शैक्षणिक कर्ज किंवा शिष्यवृत्तीचा विचार करा
जर तुम्ही तुमच्या मुलाचे उच्च शिक्षण घेऊ शकत नसाल तर तुमच्याकडे शैक्षणिक कर्जाचा पर्याय देखील आहे. यासाठी, चांगल्या व्याजदराचे कर्ज निवडा. तसेच, सहज परतफेड असलेल्या कर्जाची निवड करा. याशिवाय, तुमच्याकडे शिष्यवृत्तीचा पर्याय देखील आहे.
वाचा - पाकिस्तानी शेअर बाजारात भूकंप, पण भारतीय मार्केटवर झाला नाही परिणाम, 'ही' आहेत ३ मोठी कारणे
आपात्कालीन निधी
गुंतवणूक करताना काही पैसे आपात्कालीन निधीसाठी बाजूला ठेवा. अनेकदा आर्थिक आणीबाणीमध्ये हे पैसे तुमच्या कामाला येऊ शकतात. उदा. अचानक नोकरी गेली तर तुमच्या मुलाला अर्ध्यातून शिक्षण सोडावे लागू शकते. अशा परिस्थितीतमध्ये किमान ६ महिने पुरतील इतके पैसे तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे.