Lokmat Money > बिझनेस न्यूज > शेअर बाजारात पैसे गमावले? या बँकांमध्ये तुम्हाला FD वर मिळतोय ९.५०% पर्यंत परतावा

शेअर बाजारात पैसे गमावले? या बँकांमध्ये तुम्हाला FD वर मिळतोय ९.५०% पर्यंत परतावा

Bank FD Rate : सध्या शेअर बाजारात मोठी घसरण सुरू आहे. अशा परिस्थितीत छोट्या गुंतवणूकदारांना यापासून चार हाथ लांब राहण्याचा सल्ला दिला जात आहे. आजकाल अनेक बँका मुदत ठेव योजनांवर चांगला परतावा देत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 14:08 IST2025-03-14T14:08:56+5:302025-03-14T14:08:56+5:30

Bank FD Rate : सध्या शेअर बाजारात मोठी घसरण सुरू आहे. अशा परिस्थितीत छोट्या गुंतवणूकदारांना यापासून चार हाथ लांब राहण्याचा सल्ला दिला जात आहे. आजकाल अनेक बँका मुदत ठेव योजनांवर चांगला परतावा देत आहे.

fd interest rate up to 9 50 percent these 4 banks offer above 9 percent fd interest rate | शेअर बाजारात पैसे गमावले? या बँकांमध्ये तुम्हाला FD वर मिळतोय ९.५०% पर्यंत परतावा

शेअर बाजारात पैसे गमावले? या बँकांमध्ये तुम्हाला FD वर मिळतोय ९.५०% पर्यंत परतावा

Bank FD Rate : शेअर बाजारातीलगुंतवणूकदार सध्या सर्वाधिक चिंतेत आहेत. कारण, दिवसेंदिवस बाजार घसरत चालल्याने अनेकांचे पोर्टफोलिओ रेड झोनमध्ये गेले आहेत. ही घसरण किती काळ राहणार? बाजार कधी रिकव्हर होणार, असे असंख्य प्रश्न गुंतवणूकदारांच्या मनात आहेत. अशा परिस्थितीत गुंतवणूकदार आता सुरक्षित आणि निश्चित परतावा देणारे पर्याय शोधत आहेत. तुम्ही देखील अशी शोधाशोध करत असाल तर काही बँका आता शेअर मार्केटसारखा परतावा बँक एफडीवर देत आहेत. हो, तुम्ही बरोबर वाचलत. कारण या बँकांमध्ये तुम्हाला FD वर ९.५०% पर्यंत व्याज मिळेल.

स्मॉल फायनान्स काय आहेत?
पहिल्यांदा स्मॉल फायनान्स बँका म्हणजे काय हे समजून घेऊ. “देशात स्मॉल फायनान्स बँका ही आरबीआयने भारत सरकारच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेली बँकिंगची एक विशेष श्रेणी आहे. बँकिंग क्षेत्रापासून वंचित असलेल्या लोकांना ही सेवा उपलब्ध करुन देणे हा त्यांचा मुख्य उद्देश आहे. जसे छोटे शेतकरी, छोटे व्यापारी, छोटे उद्योग आणि असंघटित क्षेत्रातील लोक. म्हणजेच या बँकांची निर्मिती सर्वसामान्यांना मदत करण्यासाठी करण्यात आली आहे.

नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँक
या यादित नाव नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँकेचं येते. येथे तुम्हाला ३.५०% ते ९% पर्यंत व्याज मिळू शकते. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा दर ४% ते ९% पर्यंत आहे. या बँकेत तुम्ही ३ कोटी रुपयांपर्यंत एफडी करू शकता. येथे ७ दिवस ते १० वर्षांपर्यंत FD सुविधा उपलब्ध आहे. १८ महिने १ दिवस ते ३६ महिन्यांपर्यंतच्या मुदत ठेवींवर तुम्ही ९% कमाल व्याज मिळवू शकता.

इक्विटास स्मॉल फायनान्स बँक
ही स्मॉल फायनान्स बँक ग्राहकांना मुदत ठेवींवर ३.५% ते ८.२५% आणि ज्येष्ठ नागरिकांना ४% ते ९% व्याज ऑफर करते. या बँकेत तुम्ही ३ कोटी रुपयांपर्यंत एफडी करू शकता. येथे तुम्ही ७ दिवस ते १० वर्षांसाठी FD करू शकता. ज्येष्ठ नागरिकांना ८८८ दिवसांच्या FD वर जास्तीत जास्त ९% व्याज मिळेल.

युनिटी स्मॉल फायनान्स बँक
पुढील बँक युनिटी स्मॉल फायनान्स बँक आहे. येथे सामान्य लोकांना ४.५०% ते ९% आणि ज्येष्ठ नागरिकांना ४.५% ते ९.५०% व्याज ऑफर करते. इथेही तुम्ही ३ कोटी रुपयांपर्यंतच एफडी ठेऊ शकता. मुदत ठेवीचा कालावधी ७ दिवस ते १० वर्षांसाठी आहे. १००१ दिवसांच्या FD वर जास्तीत जास्त व्याज सामान्य लोकांसाठी ९% आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ९.५०% असेल.

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक
तिसरी बँक उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक आहे. येथे सामान्य लोकांना ४% ते ८.५% आणि ज्येष्ठ नागरिकांना ४.६% ते ९.१०% व्याज मिळू शकते. येथे तुम्ही ७ दिवस ते १० वर्षांसाठी FD करू शकता. ज्येष्ठ नागरिकांना २ ते ३ वर्षांच्या FD वर सर्वाधिक ९.१०% व्याज मिळेल.

Web Title: fd interest rate up to 9 50 percent these 4 banks offer above 9 percent fd interest rate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.