Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > ‘फास्टॅग’चा वार्षिक पास २.५%ने वाढला; ५६ लाख वापरकर्त्यांना फटका

‘फास्टॅग’चा वार्षिक पास २.५%ने वाढला; ५६ लाख वापरकर्त्यांना फटका

ही वाढ महागाईशी निगडित असलेल्या किरकोळ किंमत निर्देशांकांच्या आधारे करण्यात आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 07:07 IST2026-03-16T07:06:28+5:302026-03-16T07:07:25+5:30

ही वाढ महागाईशी निगडित असलेल्या किरकोळ किंमत निर्देशांकांच्या आधारे करण्यात आली आहे.

FASTag annual pass increases 56 lakh users affected | ‘फास्टॅग’चा वार्षिक पास २.५%ने वाढला; ५६ लाख वापरकर्त्यांना फटका

‘फास्टॅग’चा वार्षिक पास २.५%ने वाढला; ५६ लाख वापरकर्त्यांना फटका


नवी दिल्ली : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) ‘फास्टॅग’ वार्षिक पासच्या शुल्कात २.५ टक्क्यांनी वाढ केली असून, सध्याचे तीन हजार रुपये शुल्क आता ३,०७५ रुपये होणार आहे. १ एप्रिल २०२६ पासून हे दर लागू होणार आहेत.

ही वाढ महागाईशी निगडित असलेल्या किरकोळ किंमत निर्देशांकांच्या आधारे करण्यात आली आहे. मात्र, शुल्कवाढ मर्यादित असल्यामुळे नियमित महामार्ग वापरणाऱ्या वाहनधारकांना या पासमुळे होणारी बचत कायम राहणार आहे. शुल्कवाढ केवळ ७५ रुपये असल्याने नियमित प्रवाशांसाठी एका फेरीचा खर्च साधारण १५ रुपयांपर्यंतच राहील, जो नियमित टोलच्या तुलनेत अत्यंत कमी आहे.

५६ लाख वापरकर्त्यांना फटका
सध्या देशात ५६ लाखांहून अधिक वाहनधारकांकडे वार्षिक पास आहे. महामार्गावरील एकूण कार व्यवहारांपैकी २८ टक्के व्यवहार याच पासच्या माध्यमातून होतात. पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि रांगा कमी करण्यासाठी प्राधिकरणाने नियमावली अधिक कडक केली आहे.

कसा होतोय फायदा? 
फास्टॅग वार्षिक पास कार, जीप आणि व्हॅन अशा खासगी वाहनांसाठी उपलब्ध असून, वर्षभरात २०० वेळा टोल ओलांडण्याची सुविधा यात मिळते. या पासद्वारे वाहनधारकांना वर्षभरात २०० टोल प्रवास करण्याची परवानगी मिळते किंवा एक वर्ष पूर्ण होईपर्यंत तो वैध राहतो.

Web Title : फास्टैग वार्षिक पास 2.5% बढ़ा; 56 लाख उपयोगकर्ता प्रभावित

Web Summary : एनएचएआई ने फास्टैग वार्षिक पास शुल्क 2.5% बढ़ाया, जो 1 अप्रैल, 2026 से प्रभावी है। खुदरा मुद्रास्फीति के आधार पर यह वृद्धि ₹75 जोड़ती है। इसके बावजूद, उपयोगकर्ता नियमित टोल की तुलना में काफी बचत करते हैं। 56 लाख से अधिक वार्षिक पास धारक प्रभावित हैं। यह पास कारों, जीपों और वैन के लिए 200 टोल क्रॉसिंग प्रदान करता है।

Web Title : FASTag Annual Pass Increased by 2.5%; Impacts 5.6 Million Users

Web Summary : NHAI increased FASTag annual pass fees by 2.5%, effective April 1, 2026. The hike, based on retail inflation, adds ₹75 to the cost. Despite this, users save significantly compared to regular tolls. Over 5.6 million annual pass holders are affected. The pass offers 200 toll crossings for cars, jeeps, and vans.