lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > मनीष मल्होत्रा Air India च्या १० हजार कर्मचाऱ्यांचं रुपडं पालटणार, देणार स्टायलिस्ट लूक

मनीष मल्होत्रा Air India च्या १० हजार कर्मचाऱ्यांचं रुपडं पालटणार, देणार स्टायलिस्ट लूक

एअर इंडियाच्या १०,००० हून अधिक कर्मचार्‍यांसाठी नवीन युनिफॉर्म डिझाइन केले जातील.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 04:35 PM2023-09-29T16:35:17+5:302023-09-29T16:36:48+5:30

एअर इंडियाच्या १०,००० हून अधिक कर्मचार्‍यांसाठी नवीन युनिफॉर्म डिझाइन केले जातील.

fashion designer Manish Malhotra will change the appearance of 10 thousand employees of Air India giving a stylist look to employees | मनीष मल्होत्रा Air India च्या १० हजार कर्मचाऱ्यांचं रुपडं पालटणार, देणार स्टायलिस्ट लूक

मनीष मल्होत्रा Air India च्या १० हजार कर्मचाऱ्यांचं रुपडं पालटणार, देणार स्टायलिस्ट लूक

प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा हे टाटा समूहाच्या एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचं रुपडं पालटणार आहे. मनीष मल्होत्रा ​​यांनी डिझाइन केलेले युनिफॉर्म आता ते परिधान करतील. एअर इंडियाने मनीष मल्होत्रा यांच्यासोबत करार केला आहे. आता १० हजार फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना डिझायनर युनिफॉर्म दिले जातील. या वर्षअखेरीस कर्मचाऱ्यांना नवीन डिझाइन केलेले युनिफॉर्म उपलब्ध करून देण्याची योजना आहे.



नवे युनिफॉर्म मिळणार
एअर इंडियाच्या १०,००० हून अधिक कर्मचार्‍यांसाठी नवीन युनिफॉर्म डिझाइन केले जातील, ज्यात केबिन क्रू आणि इतर कर्मचार्‍यांचा समावेश आहे. चालू आधुनिकीकरण कार्यक्रमाचा भाग म्हणून याची सुरूवात केल्याचं एअर इंडियानं गुरुवारी सांगितलं. नवीन युनिफॉर्मला स्टायलिश आणि आधुनिक लूक देण्यासाठी एअर इंडियानं प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांच्यासोबत भागीदारी केली आहे.

मनीष मल्होत्रा ​​आणि त्यांच्या टीमनं एअर इंडियाच्या फ्रंटलाइन कर्मचार्‍यांची भेट घेतली, त्यांच्या विशिष्ट गरजा चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी त्यांच्याशी चर्चाही केल्याची माहिती समोर आली आहे. एअर इंडियाच्या कर्मचार्‍यांसाठी २०२३ च्या अखेरीस नवीन युनिफॉर्म उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं एअर इंडियानं म्हटलंय.

Web Title: fashion designer Manish Malhotra will change the appearance of 10 thousand employees of Air India giving a stylist look to employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.